सनी लिओन बनली “डर्टी गर्ल’ 

सनी लिओन लीड रोल करत असलेल्या “वीरमादेवी’ला कर्नाटकमध्ये मोठा विरोध होतो आहे. “पद्‌मावत’विरोधात जसे आंदोलन झाले होते, तसेच आंदोलन “वीरमादेवी’च्या विरोधातही व्हायची चिन्हे दिसायला लागली आहेत. म्हणून सध्या तरी या सिनेमाचे शुटिंग थांबवले गेले आहे. दुसरीकडे सनीची वेब सिरीज “करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओन’बाबतही जोरात चर्चा सुरू आहे. या सगळ्या गदारोळामध्ये सनीचा एक म्युझिक अल्बम रिलीज झाला आहे. या म्युझिक अल्बमने तिच्या नावाची जोरदार हवा केली आहे.

“डर्टी गर्ल’नावाच्या या अल्बममध्ये तिच्याबरोबर पती डॅनिएल वेबरही दिसतो आहे. सनीच्या सेक्‍सी अदा आणि सौंदर्य यामुळे तिचे चाहते पुन्हा एकदा घायाळ झाले आहेत. या गाण्यामध्ये सनीबरोबर टिव्ही ऍक्‍ट्रेस करिष्मा तन्नाही आहे. हे गाणे रिलीज झाल्याला दोन दिवसच झाले आहेत पण इंटरनेटवर या गाण्याच्या व्हिडीओला आतापर्यंत 50 लाख हिट्‌स मिळाल्या आहेत. सनी ग्लॅमरस आणि हॉट दिसते, हे काही नवीन नाही. इक्का सिंह शिवांगी आणि एनबी यांनी हे गाणे गायले आहे. या गाण्यामुळे सनीची ग्लॅमरस इमेज आणखीन पक्की झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)