सनी लिओन चक्‍क “आमदार निवासा’त

आमदार निवास म्हटले की नेतेमंडळी आणि राजकारणाचे अपेक्षित चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. पण, याच आमदार निवासात आता अभिनेत्री सनी लिओनला पाहता येणार आहे. पण सनी लिओन खऱ्याखुऱ्या आमदार निवासात नाही तर “आमदार निवास’ नावाच्या आगामी चित्रपटातून झळकणार आहे.

सध्या मुंबईतील अंधेरीत संजीव राठोड दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, सनी पुन्हा एकदा मराठी चित्रपटामध्ये झळकणार असल्यामुळे सध्या चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यापूर्वी सनीला “बॉईज’ या चित्रपटामध्ये “कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ या गाण्यावर नृत्य करताना आपण पाहिले आहेच.

त्यामुळे आता “आमदार निवास’मध्ये ती नेमकी कोणत्या गाण्यावर थिरकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यात ती “शांताबाई’ या प्रचंड गाजलेल्या गाण्यावर ठेका धरणार आहे. यासाठी तिची वेशभूषाही अस्सल मराठमोळी ठेवण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
3 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)