सनी बगाडे टोळीतील नऊ जणांच्या पोलीस कोठडीत वाढ

पुणे – कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथून सळई घेवून कर्नाटक येथे जात असलेल्या ट्रकला कार आडवी लावून दोघांना मारहाण करून त्यांच्याकडील पैसे घेऊन अपहरण करणाऱ्या सनी बगाडे टोळीच्या म्होरक्‍यासह नऊ जणांच्या पोलीस कोठडीत 21 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विशेष मोक्का न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी हा आदेश दिला आहे.
सनी उर्फ संतोष अनंता बगाडे (रा. जयभीमनगर, इचलकरंजी), साजीद उर्फ टिपू बाळू उर्फ दस्तगर नाईक (रा. शाहूनगर, कागल), अभिजित निवास संकपाळ (रा. कोल्हापूर), रियाज अयुब हैदर (रा. आझादनगर, कबनूर ता. हातकणंगले), दीपक अनिल सावंत (रा. महात्मा गांधीनगर, जे. के. नगर, तारदाळ, ता. हातकणंगले), किरण उर्फ अमर अनंता बगाडे (रा. जयभीमनगर, इचलकरंजी), अक्षय अर्जुन भोसले (रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले), मनिष भरत सांगावकर (रा. इचलकंरजी ता. हातकणंगले), सुखदेव उर्फ छोट्या चांगदेव ढावारे (रा. इचलकरंजी ता. हातकणंगले) अशी पोलीस कोठडीत वाढ झालेल्यांची नावे आहेत. याबाबत बेळगाव येथील व्यापारी प्रवीण भीमराव जाधव (20, कागवाड. ता. अथणी, जिल्हा बेळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. टोळीचा सूत्रधार सनी बगाडे याच्यावर गंभीर प्रकारचे 10 गुन्हे दाखल आहे. हा प्रकार 17 जानेवारी 2018 पहाटे साडेपाचच्या अगोद रेंदाळ ते बोरगाव रोडवर घडली. सनी बगाडे याची संघटितपणे गुन्हेगारी करणारी टोळी आहे. फिर्यादी प्रवीण जाधव आणि वाहक हे कागल येथे जात असताना आरोपींच्या कारने त्यांच्या ट्रकला कार आडवी घातली. जाधव आणि वाहक ऐवळे यांना मारहाण करून त्यांच्याकडील एक हजार रूपये काढून घेतले. त्यानंतर दोघांचे अपहरण करून त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधून त्यांना रिकाम्या ट्रकसह तंवदी घाट येथे सोडून दिले. दरम्यान, आरोपींनी ट्रकमधील सर्व सळई चोरून नेली. गुन्ह्यात फरारी असलेल्या सनी मोहितेला अटक करायची आहे, अशा पध्दतीने कोणावर दबाव आणून मालमत्ता मिळवली आहे. बॅंकेत किती ठेवी आहेत, त्यांनी किती मालमत्ता मिळवली आहे, त्यांच्या उत्पन्नाचे आणि उदरनिर्वाहाचे नक्की काय स्त्रोत आहेत, याचा तपास करायचा आहे. टोळीचे आणखी कोण सदस्य आहेत, आरोपींच्याकडे असलेली वाहने ही कोणाच्या नावांवर आहेत याचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी विशेष सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)