सना कपूर साकारतेय “सरोज’

अभिनेत्री सुप्रिया पाठक आणि अभिनेते पंकज कपूर यांची मुलगी सना कपूर सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात ती मुख्य भूमिका साकारत असून मुख्य अभिनेत्री म्हणून हा तिचा पहिला चित्रपट आहे. यापूर्वी शाहिद कपूरच्या “शानदार’मध्ये ती झळकली होती. दिग्दर्शक अभिषेक सक्‍सेना यांच्या “सरोज का रिश्‍ता’ या चित्रपटात आता ती सरोजची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटाबाबत सना म्हणाली की, हे जाणून घेणे फार महत्वाचे असते की, तुम्ही एक माणूस म्हणून फार युनिक आहात. एकाच बॉक्‍समध्ये सर्वांना फिट करू नये. तुम्हाला जर स्वत:ला बदलायचे असेल तर तुमच्या मर्जीने बदला. याच कारणाने मला हा विषय आवडला.

पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारण्याचे दडपण आहे का? यावर ती म्हणाली की, सध्या चित्रपटाच्या जबाबदारीबाबत मी काही विचार करत नाही. मी तो विचार प्रमोशनवेळी करेन. मी सध्या “सरोज’ आहे आणि ही भूमिका मला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. मला आशा आहे की, लोकांना ही भूमिका आवडेल, असे सनाने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)