सनातन संस्थेवर बंदी घाला: अशोक चव्हाण 

मुंबई: सनातन संस्थेच्या लोकांकडून देशातील धर्मनिरपेक्षतेवर घाला घालण्यात येत असून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा त्यांचा डाव आहे. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा हात असल्याने सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.
तसेच नालासोपारा येथे दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या कारवाईनंतर विविध स्तरातून सनातन संस्थेवर टीका होत आहे.
दहशतवादविरोधी पथकाने नालासोपारा येथून 20 बॉम्ब तसेच काही स्फोटके जप्त केली आहेत. तर वैभव राऊतसह सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या दोन ते तीन सदस्यांना अटक केली आहे. देशाच्या एकसंघतेच्या दृष्टीकोनाने ही एक गंभीर बाब आहे. देशात स्वातंत्र्य दिवस, ईद, गणपती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात याच पार्श्वभूमीवर अशा प्रकारची घटना घडण्यामागे षडयंत्र आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले. तसेच सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करत सरकार या विषयावर अजूनही गंभीर नसल्याचे बोलून दाखवले.
चव्हाण म्हणाले, दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या धडक कारवाईत सुरुवातीला 20 बॉम्ब आणि स्फोटके जप्त केली होती. त्यानंतर आणखी 50 बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी सनातनसंस्थेच्या वैभव राऊतसह इतर दोन-तीन लोकांना अटक करण्यात आली आहे. ही खूप मोठी घटना असून याद्वारे देशातील धर्मनिरपेक्षतेवर घाला घालण्यात येत असून धर्माचे ध्रुवीकरण करण्यात येत आहे, त्यामुळे सनातन संस्थेवर बंदी घालायला पाहिजे.
दरम्यान, एटीएसच्या पथकाने गुरूवारी नालासोपाऱ्याच्या भांडार आळीतल्या घरातून तब्बल 20 देशी बॉम्ब आणि 50 बॉम्ब बनवण्याचे सामान हस्तगत केले होते. तसेच हिंदू जनजागृतीच्या वैभव राऊत, शरद कळसकर आणि शिवप्रतिष्ठानच्या सुधन्वा गोंधळकेरला एटीएसने अटक केली होती.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)