अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जीच्या अनेक हिट सिनेमांपैकी 2005 च्या “बंटी और बबली’चा सिक्‍वेल करण्याचा विचार आदित्य चोप्रा करत होता. मात्र त्या सिक्‍वेलला अनुसरून चांगली कथा न मिळाल्याने त्याला हा नाद सोडून द्यावा लागला.

आता पुन्हा या सिनेमाच्या सिक्‍वेलची तयारी सुरू झाल्याचे समजते आहे. मात्र त्यासाठी आपल्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही, असे अभिषेकने सांगितले. शाद अलीने दिग्दर्शित केलेल्या “बंटी और बबली’मध्ये अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जीची जोडी हिट झाली होती. याशिवाय बिग बी अमिताभ बच्चन आणि “कजरा रे’ गाण्याच्या निमित्ताने ऐश्‍वर्या रायही यामध्ये दिसली होती.

एका अर्थाने अख्खे बच्चन खानदानच या सिनेमात एकत्र आले होते. मात्र सध्या तरी “बंटी और बबली’च्या सिक्‍वेलमध्ये आपण काम करत नसल्याचेही अभिषेकने स्पष्ट केले. “धूम 4′ मध्येही अभिषेक बच्चन असल्याचे ऐकिवात आले होते. त्याबद्दलही अभिषेकने स्पष्टिकरण दिले आहे.

या सिनेमाबाबत आदित्य चोप्राकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आपल्यापर्यंत आलेला नाही. त्यामुळे अशा कोणत्याही अफवांवर आपण विश्‍वास ठेवायला तयार नाही, असे तो म्हणाला. सध्या अभिषेक आपल्या “मनमर्जियां’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)