सध्या ड्रग्ज सहज मिळत नसल्यामुळे “कप सिरप” झाले नशेचे सिरप

थंडीमुळे आणि वातावरणातील होणाऱ्या, बदलयांमुळे सगळीकडेच सर्दी – खोकल्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यानुसार औषधांच्या दुकानात सर्दी-खोकल्याच्या कफ सिरपचा खप सुद्धा वाढला आहे. या सिरपचा उपयोग सर्दी – खोकल्यासाठी कमी आणि नशेसाठी अधिक प्रमाणात वापर होत असल्याची  धक्कादायक बाब समोर आली आहे.

यापूर्वी सुद्धा मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने यंदा विविध प्रकारच्या कफ सिरपचा (औषधांचा) लाखो रुपयांचा साठा जप्त केला आहे. रस्त्यावरील गर्दुल्यांसह श्रीमंत तरुणांमध्ये या सिरपची मागणी वाढली असून, थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांमध्येही वापर होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकांनी ड्रग्ज पुरवणाऱ्यां विरोधात चांगलीच कंबर कसल्याने सध्या ड्रग्ज सहज मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे या नशेबाजांनी प्रतिबंधक औषंधाचा डोस घेण्याकडे आपला मोर्चा वळविला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केमिस्टमध्ये कफ सिरप हे प्रिस्क्रिप्शन शिवाय सर्वाधिक विक्री होणारे औषध असल्यामुळे हे सहजरित्या मिळू शकते. गेल्या वर्षीपेक्षा यंदा कफ सिरपची मागणी दुपटीने वाढली असून, छोट्या-छोट्या पार्ट्यांमध्येही याचा नशेसाठी वापर केला जातो हे, अशा अनेक घटना समोर आल्या आहे. तरुणाईमध्ये या कफ सिरपचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आल्याचे दिसून येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)