सद्‌गुरू सरुताईंचा रथोत्सव उत्साहात

मायणी, दि. 1 (वार्ताहर) – महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील संत सद्‌गुरू मातोश्री सरुताई माऊली यांच्या सहाव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त वार्षिक पालखी व रथोत्सव सोहळा शाही मिरवणूकिसह मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. सोमवारी सकाळी 11 वाजता संत मातोश्री सरुताई चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दिलीप येळगावकर व त्यांच्या पत्नी सौ. उर्मिला येळगावकर यांच्या हस्ते, ट्रस्टचे सचिव रवींद्र बाबर व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रथोत्सव सोहळ्यास सुरवात झाली.
सोमवारी पहाटे 4.32 वाजता संत सद्‌गुरू मातोश्री सरुताई माऊली यांचा फुलांचा मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी हजेरी लावल्यामुळे संत सरुताई मठ परिसर गर्दीने फुलून गेला होता. सरुताई यांची प्रतिमा फुलांनी सजविलेल्या रथामध्ये बसविण्यात आली. यानंतर सरुताई माता की जयच्या जयघोषात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सवास सुरुवात झाली. रथासमोर माऊलींची पालखी, हत्ती, उंट, घोडे यांच्या शाही मिरवणुकीसह गजी, बॅंजो, बॅंड, ढोलताशाच्या गजरात निघालेल्या सोहळ्याने मने जिंकली. सरुताईंचा रथ मठापासून नवी पेठ, उभी पेठ, चावडी चौक, बसस्थानक परिसर, नाथ मंदिर, मुख्य बाजार पेठेतून मराठी शाळा, चांदणी चौकमार्गे रात्री मंदिरामध्ये पोहचला. रथसोहळ्यामध्ये पालखी दिंडी सोहळा व रिंगण सोहळा आणि अश्व रिंगण सोहळा चांदणी चौक येथे पार पडला. दिवसभर रथ मार्गामध्ये मेवा मिठाई व लहान मुलांच्या खेळण्याची दुकाने थाटली होती. संत मातोश्री सरुताईच्या भाविक भक्तांनी दहा रुपयांपासून ते एक हजार रुपयांच्या माळा रथावर अर्पण केल्या. रथ मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मायणी पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी याच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)