सद्‌गुरू गाडगे महाराज कॉलेजला स्वायत्ततेचा दर्जा

राज्यातील पहिले ठरल्याची प्राचार्य मोहन राजमाने यांची माहिती

कराड – रयत शिक्षण संस्थेच्या येथील सद्‌गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाने स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्रदान केला आहे. ग्रामीण भागातील स्वायत्तता मिळविणारे सद्‌गुरू गाडगे महाराज महाविद्यालय हे महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय ठरले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी दिली.

1954 साली 54 विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सद्‌गुरू गाडगे महाराज यांच्या नावाने सुरू केलेल्या या महाविद्यालयास दानशूर बंडो गोपाळा मुकादम तात्या यांनी भरघोस आर्थिक मदत केल्याने हे महाविद्यालय उभे राहिले. रयत शिक्षण संस्था आपला शतक महोत्सव साजरा करत असताना, संस्थेच्या पहिल्या ग्रामीण भागातील महाविद्यालयास स्वायत्तता प्राप्त होणे ही कर्मवीर आण्णांनी स्वप्न पाहिलेल्या रयत विद्यापीठाच्या दृष्टीने झालेली वाटचाल महत्त्वाची मानली जात आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधनाला दिशा देणारे विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी, शास्त्रज्ञ व उद्योजक देणाऱ्या सद्‌गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाने आपल्या लौकिकात मानाचा तुरा खोवला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवाजी विद्यापीठ कक्षेतील गुणात्मक व संख्यात्मक अग्रेसर असणाऱ्या या महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या 12 हजार 486 असून ज्युनिअर महाविद्यालयात कायम व तासिका तत्त्वावर असे एकूण 152 प्राध्यापक असून ज्युनिअर विभागाकडे 98 प्राध्यापक, व्यवसाय शिक्षण, बी. सी. एस., बी. सी. ए., बायोटेक विभागाकडे 30 उच्च शिक्षा विद्याविभूषित प्राध्यापक अध्ययन -अध्यापनाचे काम करत आहेत. तर 132 शिक्षकेत्तर सेवक कार्यरत आहेत. विद्यार्थिनी वसतिगृहात 519 मुली व मुलांच्या वसतिगृहात 189 विद्यार्थी असून केशवराव पवार ग्रंथालयात 1 लाख 44 हजार 4 एवढी ग्रंथसंपदा आहे. महाविद्यालय 15 एकर परिसरात विभागलेले आहे. स्वायत्त दर्जा मिळाल्याने महाविद्यालयाला वर्तमान परिस्थितीला अनुरूप असा अभ्यासक्रम ठरविण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. यामुळे पारंपरिक अभ्यासाची चौकट बदलणे शक्‍य होणार आहे. 65 वर्षात विविध क्षेत्रात नाव कमावणारे गुणवंत विद्यार्थी या महाविद्यालयाने घडविले आहेत.

या स्वायत्त दर्जामुळे जागतिकीकरणाच्या युगात विद्यार्थी आत्मनिर्भर होतील. जागतिकीकरणाच्या काळात स्वायत्ततेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांभिमुख शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्‍वास प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी व्यक्‍त केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)