सदाशिवपेठेत घुमला नगरी “माईक’चा बुलंद आवाज (भाग २)

एरव्ही सदाशिव पेठेत पुरुषोत्तम एकांकिका स्पर्धेच्या निकालाच्या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त… स्पर्धेचा निकाल जाहीर होऊ लागला की ढोल- ताशांच्या निनादात विजेत्या संघाचा जल्लोष असं वातावरण असायचं. सहभागी संघांच्या आपसात कुरबुरी व्हायच्या. कित्येकदा लाठीमार करावा लागतो. मात्र, यंदा यापैकी काहीच घडलं नाही. निकाल जाहीर होऊ लागला तसतसा एकेक संघानं तेथून काढता पाय घ्यायला सुरुवात केली. त्या संध्याकाळी सदाशिव पेठेत घुमत राहिला तो फक्त नगरी “माईक’चा बुलंद आवाज.

“माईक’ला पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत प्रथम पारितोषिकासह दिग्दर्शनाचे प्रथम, सर्वोत्कृष्ट अभिनयाचे कै. अनंत काकाजी जोगळेकर पुरस्कार अशी पारितोषिके मिळाली आहेत. मराठी दिनानिमित्त शासनाने आयोजित नाटक, चित्र, शिल्प, नृत्य असा एकत्र रंगमंचाविष्कार स्पर्धेत पहिल्यांदाच लेखक, दिग्दर्शक प्रमोद कसबे लिखित “दिमडी’ या गोंधळी समाजाचं वास्तव मांडणारी एकांकिका सादर झाली. तिला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. डॉ. राम रानडे, रघुनाथ क्षीरसागर यांच्यापासून सुरू झालेल्या नगरच्या रंगभूमीने व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीला अनेक उत्तम कलावंत दिले. वानगीदाखल सांगायचे झाले तर मधुकर तोरडमल, सदाशिव अमरापूरकर या दोन कलावंतांनी व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातलं मोठं योगदान दिलं.

  सदाशिवपेठेत घुमला नगरी “माईक’चा बुलंद आवाज (भाग १)

त्यानंतर अनिल क्षीरसागर, मंगेश जोशी, मकरंद खेर, चंद्रशेखर खेर, वैजयंती खेर, सुधाकर निसळ, मोहन सैद यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली. त्यानंतरच्या काळातही आयुब खान, दीपक घारू, सतीश भोपे, अच्युत देशमुख, रूपाली देशमुख, श्रीधर फडके, नितीन लचके, सुस्मिता डांगरे, डॉ. प्रवीण रानडे, प्रतिभा टेपाळे, अश्‍विनी जोशी, किशोर साव, नादीर कुरेशी, प्रताप ठाकूर, बाळकृष्ण ओतारी, सुनीता तांबोळी, संजय घुगे, धनश्री खोले, अमोल खोले, अजय खडामकर, अमित खताळ, सविता काळे-आपटे, किरण खोजे, यशराज जाधव, राम ढुमणे, संजीव झरकर, क्षितिज झावरे, मधुरा झावरे, श्रीकृष्ण इनामदार, प्रिया बापट, विलास बडवे, तुषार बुगे, अमृता बेडेकर, प्रसाद बेडेकर,प्रभंजन कनिंगध्वज, अविनाश कराळे, सुनील कात्रे, रवींद्र काळे, विनायक कौंडिण्य, हेमंत कदम, शशांक कुंटला, वैभव कुऱ्हाडे, देविप्रसाद सोहनी, प्रशांत कांबळे, सौरभ कुलकर्णी, सुधीर कुलकर्णी, योगेश कुलकर्णी, शौमिक कुलकर्णी, सायली मोडक, शैलेश मोडक, अंकिता मोडक,सागर खिस्ती, राहुल भिंगारदिवे, श्‍याम शिंदे, श्रेणिक शिंगवी, सतीश शिंगटे, किरण डिडवानिया, अद्वैत दीक्षित, योगेश विलायते, भूपाली निसळ,जयदीप हरदास, संकेत होशिंग, सदानंद भणगे, तन्मयी भावे, संजीव भोगे, बलभीम पठारे,

विलास पवार, सतीश पवार, सुनील राऊत, स्नेहा रानडे,दीपक शर्मा, रफीक शेख, हबीब शेख, सपना साळुंखे, रितेश साळुंखे, रवींद्र सातपुते, चंद्रकांत सैंदाणे, शरदचंद्र सुद्रिक, सय्यद सुफी, मनोज डाळिंबकर, अभिजित दळवी, हरिश दुधाडे, उषा देशमुख, श्रीराम देशमुख, रवींद्र व्यवहारे, शेखर वाघ, विद्या वाघमारे, मयुरी वैद्य, तुषार चोरडिया, बाळासाहेब चव्हाण, पोपट चव्हाण, सुनील तरटे, पुष्कर तांबोळी, स्वप्निल मुनोत, चंद्रकांत जाधव, नितीन जावळे, चैत्राली जावळे,वनिकांत जोशी, अशोक जोशी, संजय जोशी, अनंत जोशी, शिरीष जोशी, केदार जोशी, राजेंद्र जोग, सुनील जगधने, कुमार नवले, विजय नवले,सोमनाथ नजान, शशिकांत नजान, अजय अपूर्वा, सतीश अडगटला, मंदार अडगटला, मुकुंद गायकवाड, चेतन गाडे, अजय लांडगे, संजय लोळगे,सतीश लोटके, गणेश कराळे, रियाज पठाण, बाबासाहेब डोंगरे. आता प्रकाश धोत्रे, मिलिंद शिंदे, पूर्णानंद वाडेकर, मोहिनीराज गटणे, शमीम शेख, संहिता लेखक म्हणून अमित बैचे, संदीप दंडवते, पी. डी. कुलकर्णी व अन्य कलावंत रजत पडद्यावर आपलं बस्तान चांगलं टिकवून आहेत.

तर, नाट्य चळवळीत कृष्णा वाळके, विराज अवचिते, अमित रेखी, ऋषभ कोंडावर, संकेत जगदाळे, निखिल शिंदे, शुभम पोकळे, आकाश मुसळे, अभिषेक, अमोल साळवे, प्रमोद कसबे, मृण्मयी कुलकर्णी यांच्यासह अनेक नवोदित कलावंत रंगदेवतेची साधना करून नाट्य चळवळ बळकट करीत आहेत. या सर्व रंगकर्मींच्या प्रयत्नांतून नगरच्या नाट्य चळवळीचा आवाज आणखीच बुलंद होईल यात शंका नाही.

देविप्रसाद अय्यंगार

 मुख्य वार्ताहर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)