सदाभाऊ हा विषय संपला – शेट्टी

पुणे – ज्यांना आम्ही आमचे म्हणून सत्तेत पाठविले होते तेच आम्हाला मानत नसल्याची खंत अधिक तीव्र होत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा.राजू शेट्टी सांगितले. केंद्र व राज्यातील सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले. मंत्री पदाची लालसा मला कधीच नव्हती.उलट मी मला मंत्री पद नको असेच सांगितले होते. शेतकऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लावावेत म्हणून आम्ही आमच्यातील काही जणांना सत्तेत पाठविले होते. त्यांनी सत्तेची पदे स्विकारली पण आम्हाला विसरले.त्याची खंत जास्त वाटते.उलट आम्ही सत्तेसाठी उतावीळ असल्याचे आरोप आमच्यावर करण्यात आले त्यात तथ्य नाही.वस्त्रोद्योग महामंडळाची गाडी व घर संघटनेनेसाठी वापरले जात असल्याचेही आरोप झाले पण आम्ही पदाचा कुठलाही गैरप्रकार केला नाही.उलट रविकांत तुपकर यांनी नागपूर आणि सोलापूर येथे टेक्‍साटाईल पार्क उभारण्याचे काम सुरु केले आहे.

सदाभाऊ खोत यांची तर संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे त्यामुळे त्यांचा विषय सुद्धा आता संपला आहे. यावेळी राजू शेट्टी यांनी कृषी आयुक्त सुनिल केंद्रेकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.अवघे तीन महिन्यात त्यांची बदली करण्यात आली.त्याचे गौडबंगाल काय याबाबत आता आम्ही जाब विचारणार आहोत.अशी कोणती माहिती त्यांना मिळाली होती की ज्यामुळे त्यांची तातडीने बदली करण्यात आली याचा खुलासा सरकारला करावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)