सदाभाऊंनी परत केले राजू शेट्टींचे अडीच लाख रू.

सांगली/मुंबई: कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वडीलांच्या आजारपणावेळी खासदार राजू शेट्टींकडून घेतलेले अडीच लाख रुपये परत केल्याचे सांगण्यात येत आहे. सदाभाऊंचा मुलगा सागर खोत यांनीच ही माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच सदाभाऊंच्या आईने सदाभाऊंना वडीलांच्या आजारपणावेळी मुख्यमंत्र्यांनी मोठी मदत केल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर राजू शेट्टींनी सदाभाऊंना दिलेल्या अडीच लाखांच्या मदतीची बॅंकेची स्लिप सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यामुळे राजू शेट्टींनी आठवण करुन देताच, सदाभाऊ खोत यांनी त्यांना अडीच लाख रुपये परत केले आहेत. त्यामुळे सदाभाऊ आणि राजू शेट्टींमध्ये केवळ मतभेदच नव्हे तर मनभेदही निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. इतकेच नाही तर सदाभाऊ यांनी राजू शेट्टींना खरमरीत पत्र लिहून अडीच लाख परत करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, सदाभाऊंनी राजू शेट्टींना जे पत्र लिहिले आहे त्यात त्यांनी आजपर्यंत त्यांच्यामध्ये असणाऱ्या कौटुंबिक वातावरणाविषयी बोलत असताना या वातावरणाला शेट्टींच्या बगलबच्च्यांमुळे नजर लागल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)