“सदानंदाचा येळकोट येळकोट’ने निमगाव दुमदुमले

  • चैत्र पौर्णिमेनिमित्त दीड लाखांहून अधिक भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ

दावडी, दि. 31 (वार्ताहर)- चैत्र पौर्णिमेनिमित्त तमाम भाविकांचे कुलदैवत असलेल्या खेड तालुक्‍यातील निमगाव येथील खंडोबाचे दीड लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. दिवसभर मंदिर परिसर सदानंदाचा येळकोट येळकोट करीत खोबरे भंडाऱ्याची उधळण करीत भविकांनी दर्शन घेतले, अशी माहिती जय मल्हार यात्रा व्यवस्था मंडळ अध्यक्ष बबनराव जगन्नाथ शिंदे आणि सचिव बाबासाहेब शिंदे यांनी दिली.
मराठी वर्षा मधील पहिली पौर्णिमा म्हणजे चैत्र पौर्णिमा असल्यामुळे आज (शनिवारी) सकाळी देवाला अंघोळ घालून देवाची पूजा, अभिषेक, होम, हवन , करण्यात आला मानाचा काठ्यांची मिरवणूक काढून त्यानंतर पूजा अर्चा करून देवास नैवद्य अर्पण करून भाविकांना दर्शन घेण्यासाठी मंदिर खुले करण्यात आले. सकाळपासून भाविकांनी देवदेव करण्यासाठी घरातील कुलदैवत खंडोबा नेऊन तेथे तळी भरली जात होती. तर मंदिर परिसरात दिवसभरात दोनशे पेक्षा अधिक जागरण करण्यात आले.
उत्तर पुणे जिल्हातील सर्वात मोठी यात्रा म्हणून चैत्री पोर्णिमाओळखली जाते. या यात्रेसाठी आपल्या कुलदैवताचे दर्शन घेण्यासाठी खेड तालुक्‍यासह ठाणे, नगर, नाशिक, जुन्नर, आंबेगाव, शिरूर येथील भाविकांनी कुलधर्म कार्य व नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. ही यात्रा सुरळीत पाडण्यासाठी अध्यक्ष बबनराव शिंदे, उपाध्यक्ष संतोष शिंदे, कार्याध्यक्ष संभाजी राऊत, सचिव बाबासाहेब शिंदे, सहसचिव प्रा. बबनराव थोरात, खजिनदार सलीम भाई पठाण, संचालक मोहन शिंदे, पोलीस पाटील व संचालक बाळासाहेब शिंदे, नवनाथ तांबे, रमेश येळवंडे, अक्षय कौटकर, माजी सरपंच अमर शिंदे, विजयसिंह शिंदे, सल्लागार बबनराव शिंदे, माणिकराव शिंदे, काळुराम भगत, विलास भगत, दत्तात्रय दाभाडे, भाऊसाहेब तांबे, बाळासाहेब येवले, महेश शिंदे, कैलास थोरात, भाऊसाहेब कोठावळे आदींनी व्यवस्था केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)