सदाकाका आणि दिनूकाकांच्या निवृत्तीची गोष्ट… (भाग-२)

निवृत्तीसाठी तरुण वयातच गुंतवणूक सुरु करणे, हाचांगलामार्ग आहे. भविष्यातील आर्थिक गरजा भागविण्यासाठी त्याची गरज आहे. म्युच्युअल फंडातील नियमित गुंतवणुकीने ते साध्य होते.

सदाकाका आणि दिनूकाकांच्या निवृत्तीची गोष्ट… (भाग-१)

दिनू काकांनी संपूर्ण आयुष्यात आर्थिक नियोजनाकडे कानाडोळाच केला. कमावेलला प्रत्येक रुपया स्वतःवर, मित्रांवर व परिवारासाठी खर्च करत राहिले. परंतु पैसे वाचवण्याचे व गुंतवणूक करण्याचे राहून गेले.

-Ads-

आज सत्तराव्या वर्षी दिनूकाका आजही आपल्या दैनंदिन गरजांसाठी काम करताना दिसतात. शारीरीक स्वास्थ ठिक नसतानाही कष्टाची कामे करावी लागत आहेत कारण कोणतीही जमापुंजी त्यांच्याजवळ नाही. हे टाळण्यासाठी काय केले पाहिजे?

भविष्यातील महागाई वाढ

आपल्याला केव्हा तरी निवृत्ती स्वीकारावी लागणार आहे. त्याचबरोबर सध्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानामुळे माणसाचे आयुर्मानही वाढले आहे. त्याचबरोबर महागाई सातत्याने वाढत राहणार आहे. येत्या काही वर्षात महागाईच्या वाढीचा दर प्रतिवर्षी सहा टक्के एवढा असेल, असे आर्थिक नियोजकांचे म्हणणे आहे. म्हणजेच आज जर तुमचा महिन्याचा खर्च ५० हजार रुपये असेल तर आणखी तीस वर्षांनी अशीच लाईफस्टाईल ठेवून जगायचे असेल तर तुम्हांला महिन्याला २.८७ लाख रुपयांची गरज लागणार आहे. आरोग्यविषयक गरजांची किंमतही वाढत जाणार असते. त्यामुळे वाढती महागाई, आरोग्याचा खर्च आणि दीर्घायुष्य लक्षात घेऊन आधीपासून निवृत्तीसाठीची तरतूद करत राहणे गरजेचे असते.

लवकर गुंतवणूक – चांगली जमापुंजी

तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळातच तुम्ही गुंतवणूक करू लागलात तर सुरवातीपासूनच चक्रवाढीने परतावा मिळत जातो व निवृत्तीपर्यंत त्यामध्ये कित्येक पटीने वाढ झालेली असते. उदाहरणार्थ जर तुम्ही २५ व्या वर्षापासून वार्षिक १२ टक्के परताव्याच्या हिशेबाने दरमहा १० हजार रुपयांची गुंतवणूक सुरु केली तर वयाच्या साठाव्या वर्षी तुमच्याकडे सहा कोटी ४३ लाख रुपये जमा झालेले असतील.

प्रत्येकाला स्व-प्रतिष्ठा महत्त्वाची असते आणि ती जपण्यात पैशाचाही सहभाग असतो. आता एकत्रित कुटुंबपद्धतीचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. मुले करिअरसाठी देशातील कुठल्याही शहरात किंवा जगाच्या पाठीवरील कुठल्याही देशात निघून जातात. त्यामुळे सदाकाका की दिनूकाका व्हायचे हे आपले आपणच ठरवले पाहिजे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)