सदाकाका आणि दिनूकाकांच्या निवृत्तीची गोष्ट… (भाग-१)

निवृत्तीसाठी तरुण वयातच गुंतवणूक सुरु करणे, हाचांगलामार्ग आहे. भविष्यातील आर्थिक गरजा भागविण्यासाठी त्याची गरज आहे. म्युच्युअल फंडातील नियमित गुंतवणुकीने ते साध्य होते.

काही दिवसांपूर्वी माझ्या ओळखीत असणारे वय वर्षे ८० आणि आर्थिक स्थिती उत्तम असणाऱ्या सदाकांकांची भेट झाली. विचारपूस झाल्यावर गप्पांमध्ये त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा आणि त्यांचा वापर आपल्या आयुष्यातील आर्थिक नियोजनासाठी कसा करता येईल हे आपण आज पाहू या…

सदानंद बर्वे यांची वाटचाल आज आपण पाहणार आहोत. सदाकाकांचे वडील त्यांच्या वयाच्या चौथ्या वर्षीच देवाघरी गेले. काकांना एकछोटी बहिण आणि आई. असे त्यांचे तिघांचे कुटुंब. स्वतःचे शिक्षण व बहिणीचे शिक्षण व घर चालवण्यासाठी कष्ट यात ते कधी मोठे झाले हे त्यांना समजले नाही. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने अल्प पैशांचे नियोजन हे काटकसरीतही झाले. शिक्षणानंतर संरक्षण क्षेत्रात नोकरी लागली आणि पाठोपाठ लग्नही झाले. परंतु लहानपणापासून आर्थिक नियोजनाची सवय असल्याने कमावलेल्या प्रत्येक रुपया काटेकोर पद्धतीने खर्च करून शक्य तितकी बचत करण्याची सवय सदाकाकांना होती.

-Ads-

काही काळानंतर जमवलेल्या पैशांचे आर्थिक नियोजन उत्कृष्ट परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंडांच्या योजनांद्वारे करण्याचे ठरवले. सदाकाकांचे आर्थिक सल्लागार व त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार छोटी-मोठी रक्कम त्यांनी सातत्याने गुंतवण्यास सुरवात केली. मुलांची शिक्षणे उत्तमरित्या पूर्ण झाल्याने मुले आपआपल्या पायांवर उभी राहिली. सदाकाकांनी स्वकष्टाने घरे घेतले, गाडी घेतली. हे सर्व होत असताना योग्य आर्थिक नियोजनाने व सातत्यपूर्ण गुंतवणुकीने १९६४ पासून सुरु झालेल्या म्युच्युअल फंडातील विविध योजनांची योग्यरित्या निवड करून सदाकाका गुंतवणूक वाढवतच गेले. वयाच्या साठाव्या वर्षी कोणतेही कर्ज न घेता स्वतःची दोन राहती घरे, कार, घरातील सर्व सुविधा सहजरित्या उभ्या केल्या. त्या सर्वाचे श्रेय ते आज योग्य आर्थिक सल्ल्याला देतात. आज वयाच्या ८० वर्षी देखील ते चार कोटींपेक्षा जास्त रकमेच्या पुंजीवर आनंदाने आयुष्य जगत आहेत. सदाकाकांचे आणखी एक मित्र दिनूकाका यांची मात्र निराळीच कहाणी आहे.

सदाकाका आणि दिनूकाकांच्या निवृत्तीची गोष्ट… (भाग-२)

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)