सदरबझारमध्ये 40 हजाराची चोरी

सातारा – सातारा शहरातील सदरबजार येथून अज्ञाताने चोरी केल्याची तक्रार दाखल झाली आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात अनिता सुधाकर मस्तुद यांनी तक्रार दिली आहे. अनिता या दि.21 रोजी पहाटे पाचच्या सुमारास घराला कडी लावुन सार्वजनीक शौचालयात गेल्या होत्या त्यावेळी अज्ञात चोरटा घरातून बाहेर गेल्याचे त्यांना दिसला.

त्यावेळी त्यांनी घरात जात पाहणी केली तेव्हा सर्व सामान अस्थाव्यस्त पडलेले त्यांना दिसले. चोरीचा संशय आल्याने त्यांनी डब्यात ठेवलेले पैसे पाहीले. त्यावेळी रोख रक्कम चाळीस हजार रुपये चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)