सदरबझारमध्ये 40 हजाराची घरफोडी

सातारा – सातारा शहरातील सदरबझार परिसरात शुक्रवारी घरफोडी झाली. चोरट्यांनी चाळीस हजारांचे सोन्याचे व चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी विजय ज्ञानु पवार (रा. सदरबझार,सातारा) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. 3 ते 4 जानेवारी दरम्यान तक्रारदार हे कामानिमीत्त परगावी गेले होते.

दरम्यान अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलुप तोडत आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी बेडरुम मध्ये असलेल्या कपाटातील चाळीस हजार रुपये किमंतीचे सोन्या,चांदीचे दागिने लंपास केले. पुढील तपास सातारा शहर पोसिल ठाण्याचे हवालदार व्ही.आर.देसाई करत आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)