सदनिकेला लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू

संग्रहित छायाचित्र.........

उंड्रीतील घटना : मुलगा आणि पती थोडक्‍यात बचावले

पुणे – इमारतीच्या 9 व्या मजल्यावरील सदनिकेस लागलेल्या आगीमध्ये महिलेचा भाजून मृत्यू झाला. या घटनेत तिचा पती जखमी झाला असून त्याच्यासह मुलगा बचावला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी पोलिसांच्या मदतीने आग अटोक्‍यात आणली. ही भीषण घटना उंड्री परिसरात घडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उंड्रीतील कडनगर येथील गंगा एस्टोरिया सोसायटीत रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता आग लागल्याची वर्दी रविवारी सायंकाळी 5 वाजून 22 मिनिटांनी अग्निशमन नियंत्रण कक्षास मिळाली. त्यानुसार कोंढवा अग्निशमन केंद्राच्या दोन आणि मुख्य अग्निशमन केंद्रातील एक अशा तीन गाड्या घटनास्थळी पोहचल्या. दरम्यान, कोंढवा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. सोसायटीच्या बी विंगमधील सदनिका क्र. 902 मध्ये आग लागल्याचे दिसून आले.

सदनिकेत महिला तसेच तिचा मुलगा अडकल्याचे नागरिकांनी सांगितले. सोसायटीतील सुरक्षारक्षक पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते. अग्निशमन अधिकारी दत्तात्रय नागलकर यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्‍यात आणली. बेडरूम बंद असल्याने त्यामध्ये आग पसरली नाही आणि आत अडकलेल्या तरूणाचा जीव वाचला. पोलिसांनी जखमी झालेली महिला आणि तिच्या पतीस उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, महिलेचा मृत्यू झाला असून सदर सदनिका संतोष कुमार या व्यक्तीची असल्याची माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली.

आगीमध्ये महिला गंभीर जखमी झाली होती, तसेच पुरूषाचे हात भाजले आहेत. दरम्यान, आगीचे कारण समजू शकले नाही अशी माहिती दत्तात्रय नागलकर यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)