सदनिकेचा ताबा न दिल्याने बांधकाम व्यवसायीकाविरुध्द गुन्हा

सदनिकेचा ताबा न दिल्याने बांधकाम व्यवसायीकाविरुध्द गुन्हा दाखल
पुणे,दि.21(प्रतिनिधी)- सदनिकेचा ताबा वेळेवर न दिल्याने तसेच आश्‍वासन दिल्याप्रमाणे सुविधा न दिल्याबद्दल एका बांधकाम व्यवसायीकाविरुध्द कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्षा पाटील(40,रा.बिबवेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार कोंढवा रियालीटी प्रा.लि.च्या संचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने सप्टेंबर 2009 मध्ये द लेक डिस्ट्रीक्‍ट बांधकाम प्रकल्पातील सदनिका बुक केली होती. या स्किममध्ये क्‍लब हाऊस ,स्कुल हॉस्पिटल, मार्केट , प्ले ग्राऊंड, गॅस पाईप लाइन स्विमिंग पुल, फुटबॉल ग्राऊंड, सोलर पॉवर स्ट्रीट लाईट, बास्केट बॉल कोर्ट, टेनिस कोर्ट आदी सुविधा देणार असल्याचे भासवले होते. या सुविधांचे ब्राऊशरही देण्यात आले होते. या सदनिकेचे 1/1/2011 रोजी रजिस्टर खरेदीखत करण्यात आले. यासाठी 37 लाख 78 हजार 890 रुपये घेऊनसदनिकेचा ताबा जून 2011 मध्ये देण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र अद्यापही सदनिकेचा ताबा देण्यात आला नाही. यामुळे फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. कोंढवा पोलीसांनी महाराष्ट्र फ्लॅट ओनरशिप ऍक्‍टनूसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पावसे तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)