सदनिका व दुकान विक्रीसाठी 1 हजार 572 अर्ज पात्र

– प्राधिकरणाकडून 23 मे रोजी सोडत
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने (पीसीएनटीडीए) सदनिका व दुकान विक्रीसाठी मागवलेल्या 1 हजार 583 अर्जांपैकी 1 हजार 572 अर्ज पात्र ठरले आहेत. याची अंतिम सोडत आता 23 मे रोजी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात होणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशाराणी पाटील यांनी दिली.

प्राधिकरणाच्या उपलब्ध सदनिका व दुकान विक्रीसाठी आज (शुक्रवारी) अंतिम तारीख होती. त्यानुसार आज पात्र-अपात्र यादी जाहीर केली असून 1 हजार 583 अर्जांपैकी 1 हजार 572 अर्ज पात्र ठरले आहेत. ही यादी प्राधिकरणाच्या www.pcntda.org.in या संकेतस्थळावर जाहीर केली आहे.

यामध्ये श्रीनाथ गृहसंकुल, थेरगाव, सेक्‍टर क्रमांक 20 आणि 28 या लहान गटातील सर्व आरक्षणासाठी अर्ज दाखल केलेल्या पात्र अर्जदारांनी सकाळी नऊ वाजता, तर चिखली डिस्ट्रिक्‍ट सेंटर, पूर्णानगर येथील मोठ्या गटातील सर्व आरक्षणातील सदनिका आणि दुकानांसाठी अर्ज दाखल केलेल्या पात्र अर्जदारांनी दुपारी दोन वाजता उपस्थित राहणे आवश्‍यक असल्याचे प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी सांगितले. सोडतीमध्ये सदनिका किंवा दुकानांसाठी नंबर न लागलेल्या अर्जदारांना 29 मे ते दि. 3 जून या कालावधीत अर्जासोबत जमा केलेले डीडी परत करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)