सत्संग सोहळ्यातून माणूस जोडण्याचे कार्य

भवानीनगर- सत्संग सोहळा आजच्या काळात माणूस माणसाशी मनाने जोडण्याचे पवित्र कार्य करत आहे, असे मत आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्‍त केले. खोरोची (ता. इंदापूर) येथील 14 वा वार्षिक संत निरंकारी सत्संग सोहळा प. पू. श्री हरिश खुषचंदानी व आमदार भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच शेकडो सत्संग भक्‍त, ग्रामस्थ, महिला भगिनी यांच्या साक्षीने उत्साही वातावरणात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

आमदार भरणे म्हणाले की, आजच्या धावपळीच्या जीवनात मनुष्याला तणावमुक्‍त व शांतता मिळवण्यासाठी सत्संग सोहळा उपयोगी पडत आहे. या सोहळ्यामुळे माणूस जोडण्याचे पवित्र कार्य घडून मानवता हाच खरा धर्म आहे, हा विचार समाजातील सर्व घटकांमध्ये रूजण्यास मदत होत आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण समाजातील उपेक्षित, वंचित घटकांच्या सेवेसाठी प्रत्येकाने घालविला तरच आजच्या काळातील खरी ईश्‍वर सेवा ठरणार आहे. खोरोची गावामध्ये हा सोहळा गेली 14 वर्षे ग्रामस्थ एकत्रितपणे येऊन मोठ्या उत्साहात साजरा करून हजारो भक्तांना अन्नदान करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)