‘सत्य’ बोललो म्हणूनच उद्धव ठाकरेंना झोंबली कोल्हापुरी मिरची : अजित पवार

कोल्हापूर/प्रतिनिधी: बाळासाहेब ठाकरे हे राज्यातील महत्वाचे नेते आहेत. त्यांचे स्मारक ५वर्षे का रेंगाळले असा विचारलेला माझा प्रश्न चुकीचा नव्हता. स्पष्ट बोलल्यानेच उद्धव ठाकरे यांना कोल्हापुरी मिरची झोंबली, अशी टीका माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेवर केली. दरम्यान शिवसेनेकडून करण्यात आलेली टीका म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याचा टोला ही पवारांनी लगावला.

वाचा सामनाच्या अग्रलेखातील अजित पवारांवरील टीका 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रात आज अजित पवार यांची भलतीच खरडपट्टी करण्यात आली आहे. पवार यांनी बापाचे स्मारक करू शकत नाहीत ते अयोध्येला जाऊन काय करणार,असा खडा सवाल सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला होता. त्यावरून आज पवार यांचा समाचार घेण्यात आला आहे .

याविषयी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत विचारणा केली असता पवार यांनी आपल्या विधानाशी आजही ठाम आहोत, असे स्पष्ट करतानाच बाळासाहेब ठाकरे यांच्या रेंगाळलेल्या स्मारकावरून तोफ डागली होती, असे स्पष्ट करून शिवसेनेकडून करण्यात आलेली टीका म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याचा टोला त्यांनी लगावला.

जन्मदात्यास ग्रामीण भागात बाप असा शब्दप्रयोग केला जातो,तर शहरी भागात वडील असा उल्लेख केला जातो. माझा शब्दप्रयोग योग्यच आहे. चांगल्या भावनेनेच मी माझी भूमिका मांडली होती. पण सत्य बोचल्याने त्यांना मिरच्या झोंबल्या आहेत. त्यांनी माझ्यावर कितीही खालच्या पातळीवर टीका केली असली तरी त्याकडे लक्ष देत नाही. कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाहीत,असे म्हणत त्यांनी टीका बेदखल ठरवली.

काकांच्या पुण्याईने ते तरले आहेत, या शिवसेनेच्या टिकेवर पवार म्हणाले, शरद पवार हे आमचे दैवत आहे. त्यांनी पक्ष सुरू केला असल्याचे ऋण सर्वच मान्य करतो. शेवटी कोणीतरी पक्ष सुरू केल्याशिवाय त्याचे काम चालत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन केला म्हणून आज तो दिसतो, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे हेही पित्याच्या कर्तृत्वावर राजकारण करत असल्याचे दाखवून दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)