सत्यम ज्वेलर्सतर्फे “सुवर्ण दीप’ची पर्वणी

– दिवाळी सणानिमित्त विविध “ऑफर्स’
– मनमोहक दागिन्यांची ग्राहकांना भुरळ

पिंपरी – दिवाळी सणानिमित्त आवर्जून सोने खरेदी केली जाते. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या दिवाळीतही सत्यम ज्वेलर्सतर्फे सुवर्ण दीप योजनेअंतर्गत ग्राहकांसाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. खास दिवाळी सणानिमित्त कलाकुसर केलेल्या आकर्षक सुवर्णलंकाराची ग्राहकांना भुरळ पडत आहे.

सुवर्ण पारखी पिंपरी-चिंचवडकर आणि सत्यम ज्वेलर्सच्या बावनकशी सुवर्णालंकाराचे नाते दिवाळीच्या दीप आणि ज्योती इतकेच घट्ट आहे. गेल्या 35 वर्षाची परंपरा जपत सत्यम ज्वेलर्सने सुवर्ण दीप ही दिवाळी लाभदायी ऑफर जाहीर केली आहे. यंदा लाखोंची बक्षीसे जिंकण्याच्या सुवर्णसंधी बरोबरच दागिन्यांच्या मजुरीसाठी अवघे 249 रूपये, तर टेम्पल ज्वेलरीच्या मजुरीसाठी 349 रूपये आकारले जात आहेत. या लाभदायी सुवर्ण खरेदीचा लाभ घेण्यासाठी ग्राहक सत्यम ज्वेलर्समध्ये गर्दी करत आहेत.

टेम्पल ज्वेलरीमध्ये फॅन्सी बांगड्या, मंगळसूत्र, लॉंगहार, नेकलेस तसेच पारंपरिक दागिन्यांमध्ये मोहनमाळ, श्रीमंत हार, लक्ष्मी हार, शिंदेशाही तोडे यांसारख्या असंख्य सुवर्णालंकाराचा समावेश आहे. दिवाळीचा सण, मनासारखे सुवर्णालंकार आणि त्यावरील मनमोहक कलाकुसर ग्राहकांना भुरळ घालत आहे. सवलतीच्या दरात समाधानकारक सोने खरेदी करता येत असल्याने याठिकाणी येणाऱ्या ग्राहकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. निगडी, कृष्णानगर, चाकणपैकी जवळच्या कोणत्याही एका दालनाला ग्राहकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन सत्यम ज्वेलर्सचे संचालक राहुल चोप्रा यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)