“सत्यमेव जयते’ मधून देवदत्त नागेची बॉलीवूडमध्ये एन्ट्री

खंडोबाच्या व्यक्तिरेखेमुळे अवघ्या महाराष्ट्रात पोहोचलेला अभिनेता देवदत्त नागे आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून तो जॉन अब्राहमच्या आगामी “सत्यमेव जयते’ या चित्रपटात भूमिका साकारत असून नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. देवदत्तची झलकही या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

तो या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत असून त्याने “जय मल्हार’ या मालिकेत साकारलेल्या खंडोबाच्या व्यक्तिरेखेमुळे त्याला फार प्रसिद्धी मिळाली आणि त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण करावे अशी त्याच्या चाहत्यांचीही इच्छा होती. अखेर तो बॉलिवूडमध्ये जॉनच्या या चित्रपटातून दमदार पदार्पण करत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देवदत्तशिवाय आणखी एका मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर या चित्रपटात झळकणार आहे. ती अभिनेता मनोज वाजपेयीसोबत मुख्य भूमिका साकारत असून तिचे नाव सरिता असे आहे. यापूर्वी “राझी’ चित्रपटात मुनिराची निर्णायक भूमिका साकारत अमृताने बॉलीवुडमध्ये आपला ठसा उमटिवला आहे. तिच्या अभिनयाची प्रेक्षकांनी भरभरून स्तुती केली होती.

दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप झवेरी यांनी केले आहे. तर निखिल आडवाणी हे प्रोडयूसर आहेत. “सत्यमेव जयते’ हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)