‘सत्यमेव जयते’ ऍडल्ट 

जॉन अब्राहम आणि मनोज वाजपेयी यांच्या “सत्यमेव जयते’ला सेन्सॉर बोर्डाने ऍडल्ट सर्टिफिकेट दिले आहे. ही निश्‍चितच या सिनेमासाठी एक वाईट बातमी आहे. 90 च्य दशकातील कालखंडातील या सिनेमामध्ये जॉन अब्राहमच्या बरोबर आयेशा शर्मा असणार आहे. आयेशा शर्मासाठी हा पदार्पणाचा सिनेमा असणार आहे. स्वतः डायरेक्‍टर मिलाप जवेरीनी ही बातमी सगळ्यांना जाहीर केली आहे. मात्र त्यांना सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयाचे कोणतेही आश्‍चर्य वाटले नाही. सत्यमेव जयते’मध्ये प्रचंड ऍक्‍शनचा भडीमार असणार आहे. त्यातही मोहरमच्या सीनमध्ये प्रचंड हिंसाचार दाखवण्यात आला आहे.
त्याचबरोबर सिनेमातील डायलॉगही भरपूर मसालेदार आहेत. पण त्या डायलॉगमध्ये सेक्‍स किंव तशाच शब्दांचा वापर झालेला नाही. पण हे वाक्‍प्रचार प्रौढांच्याच तोंडी अधिक असतात. एवढे सगळे मुद्दे असल्यावर सेन्सॉर बोर्डाकडून त्याला लहान मुलांसमोर सादर करण्याची परवानगी मिळणे शक्‍यच नव्हते. भ्रष्टाचाराच्या मुद्दयावर सिनेमाचा फोकस असणार म्हटल्यावर त्याच्या जोडीने ऍक्‍शन येणार हे उघड होते. त्यामुळे “ए’ सर्टिफिकेट मिळणार हे क्रमप्राप्तच होते. पण तसे असले तरी सिनेमाच्या कमाईवर काही परिणाम होईल, अशी शक्‍यता नाही असेही मिलाप जवेरी यांनी म्हटले आहे. 15 ऑगस्टला “सत्यमेव जयते’ रिलीज होणार आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)