सत्यपाल मलिक यांनी पदभार स्वीकारला

श्रीनगर – सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्‍मीरच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी (21 ऑगस्ट) जम्मू-काश्‍मीरच्या राज्यपालपदी सत्यपाल मलिक यांच्या नावाची घोषणा केली होती. तत्पूर्वी एन. एन. व्होरा हे जम्मू-काश्‍मीरचे राज्यपाल होते. व्होरा यांनी पाच-पाच वर्षांचे दोन कार्यकाळ पूर्ण केले आहेत.
सत्यपाल मलिक यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बागपतमधील गरीब कुटुंबात झाला. मेरठ कॉलेजमध्ये त्यांनी महाविद्यायीन शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर राजकारणात प्रवेश केला.

1974 ते 1977 या काळात सत्यपाल मलिक हे उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार होते. त्यानंतर 1980-86 आणि 1986-1992 या काळात राज्यसभेवर गेले. 1989-1991 या काळात नवव्या लोकसभेत म्हणजे 1989 साली अलिगढ मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. बिहार, ओदिशा या राज्यांचे राज्यपालपदही त्यांनी भुषाविले आहे.
दरम्यान, जम्मू-काश्‍मीरमध्ये सध्या स्थिती अत्यंत संवेदनशील आहे.

बकरी ईदच्या दिवशीच दहशतवाद्यांनी तीन पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या केली. याशिवाय भाजपच्या एका कार्यकर्त्याचीही हत्या करण्यात आली. दुसरीकडे इसिस आणि पाकिस्तानचे झेंडेही फडवले गेले. जम्मू-काश्‍मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने पदभार स्वीकारणारे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)