सत्यजीत तांबे यांच्या हस्ते पठार भाग आमदार चषक २०१८ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

संगमनेर- घारगाव येथे पठार भाग क्रिकेट असोसिएशन व राजमाता जिजाऊ मित्र मंडळ घारगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार चषक २०१८ भव्य पठारभाग प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचं उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

या वेळी सत्यजित तांबे म्हणाले की पठार भागातील क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्रत प्रसिद्ध असून, येणाऱ्या काळात अशाच  स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात.  पठार भागात दानशूर व्यक्तींची  कमतरता नसल्याने त्यांच्याकडून क्रिकेटला कायमच प्रोत्साहन मिळत असते.पठार भागातील कार्यकर्त्यांनी या स्पर्धेचे उत्तम नियोजन केल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. या प्रसंगी बक्षीस दात्यांचे त्यांनी आभार मानले. येणाऱ्या काळात खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जे काही शक्य आहे. ते आपण क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेरच्या वतीने करू असेही  त्यांनी सांगितले.

 या प्रसंगी जिल्हा परिषद कृषी पशु संवर्धन सभापती अजय फटांगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर, पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, इंद्रजीत खेमनर, अॅड सुहास आहेर, राजेंद्र आहेर, उपसरपंच सुरेश कान्होरे, उपसरपंच संदीप आहेर,  सुभाष आहेर, डॉ गणेश वाकचौरे, सरपंच रवींद्र भोर, उपसरपंच संदीप आभाळे, बाळासाहेब ढोले, रमेश आहेर, सचिन वर्पे, गणेश लेंडे, संदीप शेळके, अशोक, गाडेकर, सुशील आभाळे, आनंदा गाडेकर, अरुण वाघ, शहवाज सय्यद सह पठार भागातील क्रीडा प्रेमी मोठ्या संखेने उपस्थित होते.

 या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या  संघाला  ५१ हजार रुपये, द्वीतिय ३१ हजार, तृतीय -२१ हजार, चतुर्थ-११ हजार रुपये व स्व अशोक खेमनर याच्या स्मरणार्थ आकर्षक चषक देणार येणार असून याची सांगता रविवार ४ एप्रिल रोजी संध्याकाळी चार वाजता होणार असून या प्रसंगी आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री मधुकर पिचड उपस्तीत राहणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
2 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)