सत्तेत आल्यास हैद्राबादचेही नाव बदलणार : भाजप मंत्र्यांची घोषणा 

नवी दिल्ली – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबादचे नाव बदलून अयोध्या ठेवल्यानंतर गुजरातचे उपमुख्यमंत्री विजय रुपानी यांनीही अहमदाबादचे नाव बदलून कर्णवाती ठेवण्याचे संकेत दिले होते. यानंतर आता हैद्राबादचेही नाव बदलणार असल्याचे एका भाजप नेत्याने सांगितले आहे. भाजप नेता राजा सिंह यांनी हे संकेत दिले आहे. यामध्ये सिकंदराबाद आणि करीमनगर यांचाही समावेश आहे.

राजा सिंह यांनी म्हंटले कि, तेलंगणामध्ये भाजप जेव्हा सत्तेत येईल. तेव्हा आमचे पहिले लक्ष्य तेलंगणाचा विकास करणे असेल तर दुसरे हैद्राबादसह दुसऱ्या शहरांची नावे बदलणे असेल. ही नावे महापुरुषांच्या नावावर ठेवण्यात येतील.

राजा सिंह यांनी इतिहासाचा दाखल देत म्हंटले कि, १६ व्या शतकात या ठिकाणी राज्य करणारे कुतुबशाही वंशजांनी भाग्यनगरचे नाव हैद्राबाद केले होते. तेलंगणामध्ये जर भाजप सत्तेत आले तर हैद्राबादचे नाव पुन्हा भाग्यनगर करण्यात येईल. तसेच ते पुढे म्हणाले, मुघल आणि निजामांनी अनेक ठिकाणची नावे बदलली आहेत. भाजपच्या सत्तेत आल्यास पुन्हा मूळ नावे ठेवण्यात येतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)