सत्तेचा उपयोग लोककल्याणासाठी

आमदार संग्राम थोपटे यांची ग्वाही

भोर : शहराची वाटचाल विकासाकडे सुरू आहे. शहरातील जनतेने कॉंग्रेसच्या हाती दिलेल्या सत्तेचा उपयोग लोककल्याणासाठी केला जाईल, अशी ग्वाही आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.
शहरातील विविध 8 कोटी 50 लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार संग्राम थोपटे यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. नगराध्यक्षा निर्मला आवारे, उपनगराध्यक्ष सुमंत शेटे, गटनेते सचिन हर्नसकर, तानाजी तारु, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, माजी नगराध्यक्षा गीतांजली शेटे आदी उपस्थित होते.
आमदार थोपटे म्हणाले की, शहरातील रस्त्यांची कामे झाली झाली असली तरी वाहतूकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यासाठी शहरात सम विषम तारखेला आणि वन-वे वाहतूकीचे नियोजन करण्यात येणार आहे. दुकानदारांनी ही स्वत: हून अतिक्रमणे काढावीत, अन्यथा नगर परिषदेच्या वतीने काढण्यात येतील. शहरातील भाजी मंडईसाठी संरक्षण भिंत, वीज, पाणी, गटर याचबरोबर 80 नवीन गाळे उभारण्यासाठी निधी मंजूर केला आहे. भोरेश्वर नगर येथील रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण, भोइर् आळी, नागोबा आळी, नवी आळी, मशालिचा माळ येथील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे. तसेच श्रीपती नगर, वाघजाई नगर, विद्यानगर, संजय नगर भागातील गटारी व रस्ता कॉंक्रिटीकरण अशा एकूण 8 कोटी 50 लाख रुपये खर्चांचे विविध विकास कामे करण्यात येणार आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)