सत्ताधा-यांच्या अन्यायकारक घरफाळा व पाणीपट्टी वाढी विरोधात जनतेचा धडक मोर्चा

खटाव, दि. 28 (प्रतिनिधी) – अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच रस्त्यावर उतरलो आहे.सत्ताधारी लोकशाही पद्धतीने वागत नसून हुकूमशाही पध्दतीने वागत आहेत. राजकारण करा पण जनतेला आवश्‍यक सोयी सुविधा तरी पूरवा व खटावच्या जनतेची होणारी पिळवणूक थांबवा. असे प्रतिपादन माजी जि.प. सदस्य महेश शिंदे यांनी केले.
खटाव (ता.खटाव) येथे वाढीव घरफळा व पाणीपट्टीच्या विरोधात ग्रामस्थांच्या वतिने ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राहूल पाटील, माजी जि.प सदस्य अशोक कुदळे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
महेश शिंदे म्हणाले, भाजप सरकारच्या माध्यमातून एप्रिलच्या दरम्यान गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार (जिहे-कटापूर) योजनेचे पाणी नेर तलावात येणार आहे. त्यामुळे येरळा वाहणार पण खटावच्या जनतेला पिण्यासाठी पाणि मिळणार नाही. सत्ताधिशांनी गुरांच्या गोठ्याला सुद्धा घरपट्टी आकारली आहे. अशुद्ध पाणी पूरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील म्हणाले “हा धडक मोर्चा खटाववासियांच्या न्याय व हक्कासाठी आहे. वाढीव घरपट्टी व पाणीपट्टी कमी न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशाराही राहूल पाटील यांनी दिला. माजी जि.प. सदस्य अशोक कुदळे व राहूल जमदाडे यांनी मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी सरपंच सौ. रत्नप्रभा घाडगे यांना निवेदन देण्यात आले. खटाव गावा मधून सत्ताधा-यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला.यावेळी कॅ.बबनराव धुमाळ, आबासाहेब देशमुख, अमर देशमुख,अभिजित देशमुख,केशव धुमाळ ,संजय टकले,उमेश भिसे,माजी ग्रामपंचायत सदस्य दादा कांबळे, संतोष वायदंडे, शहाजी भोसले व ग्रामस्थ उपस्थित होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)