सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांची मुस्कटदाबी

पिंपरी – महापालिका सभेत महापौर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना बोलू देत नाहीत. केवळ त्यांच्या हट्टापायी विनाचर्चा वादग्रस्त प्रस्ताव मंजूर केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांनी शुक्रवारी (दि. 21) पत्रकार परिषदेत केला.

यावेळी सुलक्षणा धर यांनी वायसीएम रुग्णालयातील एचबीओटी मशीन खरेदीचा संदर्भ दिला. त्या म्हणाल्या, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह आपल्यालाही बोलायचे होते. मात्र महापौर राहुल जाधव यांनी आम्हाला संधी दिली नाही. आम्ही वारंवार बोलण्याची परवानगी मागत होतो. विरोधी पक्षनेत्यांनाही बोलण्याची संधी मिळाली नाही. आमची संमती नसतानाही हा विषय बळजबरीने मंजूर करण्यात आला. ही मशीन 30 जानेवारी 2013 रोजी रुग्णालयात आणली. त्याचे प्रशिक्षण महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले. त्यानुसार सर्व काही सुरळीत चालू होते. ते सर्व कर्मचारी आजही महापालिकेच्या सेवेत आहे. असे असतानाही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिशाभूल करत आयुक्तांना या कामासाठी बाहेरील कंपनी नेमण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे केवळ संबंधीत कंपनीचा फायदा होणार आहे.

महापालिका जे उत्पन्न स्वतः कमवू शकते ती संधी आपण दुसऱ्या कंपनीला देत आहोत. याबाबत आम्हाला सभागृहात चर्चा करायची होती. मात्र हात वर करून देखील आम्हाला संधी देण्यात आली नाही. तर दुसऱ्या बाजुला भाजपच्या नगरसेविकांना तीन-तीन वेळी बोलण्याची संधी दिली जाते. त्या एकाच विषयावर परत-परत बोलत असतात. हा एक प्रकारे विरोधी पक्षांवर अन्याय आहे. महापौर पक्षपातीपणे काम करत आहेत. “एचबीओटी’ विरोधात आम्ही आयुक्‍तांकडे दाद मागणार आहोत. अन्यथा न्यायालयाचे आमच्यासाठी खुले असल्याचा इशारा त्यांनी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)