सत्ताधाऱ्यांकडूनच सापत्नभावाची वागणूक

पिंपरी –पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतरही, सत्ताधाऱ्यांकडून शहरातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला जात नाही. सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांकडूनच उद्योगनगरीला सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी केला आहे. त्यांनी पुराव्या दाखल पुणे महानगरपालिका हद्दीतील संरक्षण मंत्रालयाशी संबंधित कामे मार्गी लागल्याचा संदर्भ दिला आहे.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि संरक्षणमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.27) महाराष्ट्रातील संरक्षण मंत्रालयाशी संबंधित प्रलंबीत विकास कामांविषयी महत्त्वपूर्ण बैठक झाली. य त्यामध्ये पुणे विमानतळासाठी 15.84 एकर जागा हस्तांतरीत करणे, विमानतळासंदर्भात इतर मान्यता देणे, चांदनी चौक आणि एनडीए पाषाण रोडच्या परवानग्या देणे इत्यादी पुणे जिल्हाशी संबंधित कामे मार्गी लावली. परंतु पिंपरी-चिंचवड शहरातील संरक्षण मंत्रालयाशी संबंधीत असेलेली पिंपळे सौदागर येथील रक्षक सोसायटीचा रस्ता हस्तांतरीत करणे, पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाण पूलास संरक्षण विभागाकडून परवानगी मिळवणे. तसेच निगडी, यमुनानगर, तळवडे रुपीनगर, त्रिवेणीनगर तसेच भोसरी, दिघी, चऱ्होली मधील काही भाग रेड झोनने बाधित होत असल्यामुळे येथील बांधकामांना परवानगी दिली जात नाही. रेड झोन हद्द कमी करण्यासाठी भाजप सत्ताधाऱ्यांकडून पाठपुरावा झाला नाही. परिणामी ही कामे अद्यापही प्रलंबित राहिली आहेत.

महापालिकेतील भाजपाच्या कारभाऱ्यांनी पाठ पुरावा केला असता तर गुरूवारी (दि. 27) झालेल्या बैठकीत पिंपरी-चिंचवड शहरातील संरक्षण मंत्रालयाशी संबंधित वरील कामे मार्गी लागली असती. परंतु भाजपाच्या मनपातील बेजबाबदार पदाधिकाऱ्यांमुळे हे प्रश्‍न अद्यापही प्रलंबित राहिले आहेत. यात शहरातील भाजप कारभाऱ्यांचा नाकर्तेपणा परत एकदा दिसून आला आहे. भाजपकडे महानगरपालिकेची सत्ता सोपविल्यानंतर दोन वर्षातच पिंपरी-चिंचवडकरांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. शहरातील कचरा, पाणी पुरवठा, आरोग्य इत्यादी मूलभूत गरजा देखील व्यवस्थित पुरवू शकलेले नाहीत. केवळ आश्‍वासने देऊन जनतेची फसवणूक केली आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जे प्रकल्प राबविले आहेत; ते सुध्दा नीट सांभाळता येत नाहीत, असा टोला लगावला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)