सत्ताधारी पक्षाच्या वाचाळवीरांनी हैदोस घातलाय – अजित पवार 

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी सरकारला अनेक बोचरे सवाल केले आहे. सत्ताधारी पक्षाच्या वाचाळवीरांनी हैदोस घातलाय. वाट्टेल ते बोललं जातंय. सरकार आजही नोटबंदीचं समर्थन करतं. पण आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणतात की, नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था बिघडली. मग खरं कुणाचं? आसा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

काल मंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीपुढे शेतकऱ्यांनी टॉमेटो फेकले. दुधाला ५ रुपये अनुदान देतो म्हणाले, ते अजूनही मिळालेलं नाही. कामं करायची नाहीत, तर हे सरकार घोषणा तरी कशाला करतं, असं अजित पवार म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या वेळी झालेल्या पक्षांतर्गत बैठकीतही अजितदादांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. पाच राज्यांतल्या निवडणुकांतून स्पष्ट होतंय की, शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत सरकारबद्दल नाराजी आहे. निराधार महिलांना मदत मिळालेली नाही आणि सरकार कोटीच्या कोटी रुपयांच्या गप्पा मारतंय. या परिस्थितीत परिवर्तन गरजेचं आहे. त्यामुळे ही परिवर्तन यात्रा काढून सरकारची चुकीची धोरणं जनतेसमोर मांडायची आहेत, असं अजित पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)