सत्ताधारी नगरसेवकाच्या फलकावर कारवाई

शहरात झळकताहेत कितीतरी अनधिकृत जाहिरात फलक

महाबळेश्‍वर – महाबळेश्‍वरमध्ये चौका-चौकात मोठ्या प्रमाणात अनधिकृत फलक लागले असताना पालिकेने सत्ताधारी भाजप नगरसेवकाने लावलेल्याच फलकावर कारवाई करत फलक उतरविण्यात आला. पालिकेने केलेल्या या कारवाईमुळे शहरात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, 1 एप्रिलपासून केवळ पाच फलकांनाच परवानगी घेण्यात आल्याची नोंद पालिकेत असल्याची माहिती पालिकेचे लिपिकांनी पत्रकारांना दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरात जाहिरात फलक लावायचा झाल्यास पालिकेच्या नियमानुसार रितसर फी भरुन परवाना घेऊन फलक लावण्याचा नियम आहे. मात्र, सध्या शहरात विनापरवाना अनेक फलक झळकत आहेत. याकडे पालिका प्रशासनाने रितसर दुर्लक्ष केले आहे.

31 रोजी नगरसेवक संजय पिसाळ यांचा तर 1 रोजी युवा सेनेचे सचिन वागदरे यांचे वाढदिवसाचे लावण्यात आलेले फलक काढून सत्ताधारी भाजपचे नगरसेवक रवींद्र कुंभारदरे यांनी स्वत:चे लावले. कुंभारदरे यांचे फलक झळकताच पालिका प्रशासनाला खडबडून जाग आली आणि फलक लावण्यासाठी नियम असतात याची जाणीव झाली. पालिका प्रशासनाने तात्काळ कुंभारदरे यांनी फलक लावण्यासाठी परवानगी घेतली आहे का याची चौकशी करुन तातडीने फलक काढण्याचे आदेश दिले.

प्रशासनाच्या आदेशनानंतर पालिका यंत्रणेने झटपट कामाला सुरुवात करुन कुंभारदरे यांचे फलक काढून टाकले. विशेष म्हणजे शहरात अनेक अनधिकृत फलक झळकत असताना रवींद्र कुंभारदरे यांनी लावलेल्या फलकावरच कारवाई करण्यात आल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

मुख्याधिकाऱ्यांची द्वेषापोटी कारवाई?
रवींद्र कुंभारदरे यांनी पालिकेच्या गलथान कारभारावर वारंवार आवाज उठविला आहे. याशिवाय मुख्याधिकाऱ्यांनाही अनेकदा धारेवर धरले आहे. त्यामुळेच पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी केवळ व्यक्तीद्वेषापोटी ही कारवाई केली असल्याची शक्‍यता वर्तविली जात असून नागरिकांमध्येही तशी चर्चा सुरु आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)