सत्ताधारी आमदारांकडून केवळ श्रेय लाटण्याचे काम

  • दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता हर्षवर्धन पाटील यांनी लगावाला टोला

रेडा – सार्वजनिक कामासाठी राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. तसेच सत्ताधारी आमदार हे निष्क्रीयअसून विकास न करता केवळ नारळ फोडून श्रेय घेण्याचे काम करीत असल्याचा टोला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता लगावला.
लाखेवाडी (ता. इंदापूर) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच वृक्षारोपण माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व जिल्हा नियोजन समिती सदस्य माऊली चवरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी पाटील बोलत होते. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, सदस्या रत्नप्रभादेवी पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक वनवे, तालुकाध्यक्ष नाना शेंडे, तालुका उपाध्यक्ष जांबुवंत ढोले,
नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, सरपंच सोमनाथ गायकवाड, उपसरपंच वामन थोरवे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व भाजप व कॉंग्रेस पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या तेरा कोटी वृक्षलगवड या उपक्रमामध्ये सहभागी होऊन जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आंबा, नारळ, आवळा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 30 हजार झाडांचे वाटप, वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पुणे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या लाखेवाडी, चाकाटी रस्ता दुरुस्ती, मंदिर सभामंडप या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. श्रीमंत ढोले म्हणाले की, जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विकास कामांना मोठ्याप्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येईल.गावामध्ये अनेक विकासकामे झपाट्याने होत आहेत. पाण्यासाठी जलसंधारण, विहीर दुरुस्ती कामे पूर्ण झाली असून अनेक विकासकामे ग्रामपंचायतीच्या मार्फत भविष्यात मार्गी लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले. माऊली चवरे म्हणाले की, लाखेवाडी गावाला जिल्हा नियोजन मधून जास्तीत-जास्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल, आणि गावचा विकास केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)