सतीश साना यांना संरक्षण पुरवण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश 

नवी दिल्ली: सीबीआयचे विशेष संचालक राकेश आस्थाना यांच्याविरोधात लाचखोरीची तक्रार देणारा व्यावसायिक सतीश साना याला संरक्षण पुरवण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने हैदराबाद पोलिसांना दिला आहे. सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने आज हा आदेश दिला.

तथापी आपल्या विरोधात सीबीआयने बजावलेले समन्स रद्द करावे आणि माजी न्यायाधिश ए. के. पटनाईक यांच्या उपस्थितीतच सीबीआयला आपला जबाब नोंदवून घेण्याचा आदेश द्यावा अशी मागणी सानाने केली होती ती मात्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. साना याने सीबीआयचे विषेष संचालक राकेश अस्थाना यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आपल्याला पोलिस संरक्षण मिळावे अशी मागणी त्याने सोमवारी न्यायालयात केली होती त्याची ती मागणी मात्र मान्य करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)