सतर्क रहा ! ईव्हीएममध्ये गूढ शक्ती -राहुल गांधी 

file photo

नवी दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) विश्‍वासार्हतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. राजस्थान आणि तेलंगणमधील विधानसभा निवडणुकांसाठीची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर त्यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना ईव्हीएमबाबत सतर्क राहण्याची सूचना केली.

मध्यप्रदेशात 28 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यानंतर त्या राज्यातील ईव्हीएमशी निगडीत काही बातम्या पुढे आल्या. त्यानुसार, एका कलेक्‍शन सेंटरवर तर मतदान संपल्यानंतर चक्क 48 तासांनी ईव्हीएम पोहचले. त्यासंदर्भातील बातम्यांचा आधार घेऊन राहुल यांनी राजस्थान आणि तेलंगणमधील पक्ष कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याची सूचना देणारे ट्विट केले.

मध्यप्रदेशात ईव्हीएम विचित्रपणे वागले. बस चोरून काही ईव्हीएम दोन दिवस गायब झाले. काही ईव्हीएम तर हॉटेलमध्ये आढळले. मोदींच्या भारतात ईव्हीएममध्ये गूढ शक्ती आहे, असे त्यांनी म्हटले. देशात 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवून केंद्राची सत्ता पटकावली. त्यानंतर विविध निवडणुकांमध्ये भाजपचा विजयरथ सुसाट सुटला. त्या निकालांबाबत साशंकता व्यक्त करत विरोधकांनी ईव्हीएमच्या विश्‍वासार्हतेचा मुद्दा सातत्याने लावून धरला. आता राहुल यांनीही ईव्हीएमबाबतची विरोधकांची भूमिका उचलून धरल्याचे दिसत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)