सतरा अनाधिकृत शाळांची यादी जाहीर

अनाधिकृत शाळांना अधिकाऱ्यांचेच अभय?

दीड महिन्यांनंतर अनाधिकृत शाळांची यादी जाहीर
पुणे,दि.9 – दोन ते अडीच महिन्यापूर्वी जाहीर करावयाची यादी शाळा सुरु झाल्यानंतर तब्बल दोन महिन्याने जाहीर करणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनीच अनाधिकृत शाळांना अभय तर दिले नाही ना असा प्रश्‍न आता उपस्थित होतो आहे. पालिकेने नुकतीच शहरातील सतरा अनाधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. मात्र आता या शाळांमध्ये जर प्रवेश झाले असतील तर विद्यार्थ्यांचे कारण देत या शाळा वर्षभर सुरु ठेवाव्या लागणार आहेत.
राज्य शासनाकडून दरवर्षी अनाधिकृत शाळांची यादी काढण्याबाबत त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्था व शिक्षणाधिकाऱ्यांना सांगण्यात येते. त्यानुसार शाळा सुरु होण्याआधीच अशा शाळा अनाधिकृत आहेत हे जाहीर करणे आवश्‍यक असते. तसेच ज्या शाळा बंद होणार नाहीत त्यांना एक लाखाचा दंडही करणे आवश्‍यक असते. यंदाच्या वर्षीही याबाबचे पत्र राज्य शासनाने 2 एप्रिलाला दिले होते. मात्र पालिका अधिकाऱ्यांनी ही यादी शाळा सुरु झाल्यानंतर दीड ते पावणे दोन महिन्यांनी जाहीर केली आहे.
शाळा सुरु होण्याआधीच पालकांना सावध केले तर पालक मुलांचे प्रवेश त्या शाळांमध्ये करत नाहीत. परंतु पालिकेने आता शाळांमध्ये प्रवेश झाल्यानंतर या शाळा अनाधिकृत असल्याचे फर्मान काढले आहे. त्यामुळे आता या सतरा शाळांमधील विद्यार्थी कुठे जाणार असा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. दरम्यान अशा प्रकारे दरवर्षी या शाळांना अभय मिळते असे मत काही मुख्याध्यापकांनी व्यक्‍त केले आहे. त्यामुळेच निष्काळजीपणा करत उशीरा यादी जाहीर करणाऱ्या अधिकाऱ्यांवरच दंडांची कारवाई का होऊ नये असा प्रश्‍न आता उपस्थित होतो आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनाधिकृत शाळांची यादी
मिस क्‍लर्क स्कूल, नाना पेठ
रोझरी इंग्लिश मिडियम स्कूल, टिंगरेनगर
मरियमड स्कूल, कोंढवा
दर ए अरकम उर्दू स्कूल कोंढवा
जिंगल बेल, कोंढवा
ब्लू बेल, कोंढवा
न्यू हॉरिझोन इंग्लिश स्कूल, कोंढवा
ज्ञान प्रबोधिनी विद्या मंदिर, हडपसर
सनलाईट इंग्लिश मिडियम स्कूल, हडपसर
सेंट जेव्हीअर, सिंहगड रोड
द होली मिशन इंग्लिश मिडयम स्कूल, हडपसर
सिल्वर बेल ट्री स्कूल, खराडी
म.गांधी इंटरनॅशनल स्कूल, विमाननगर
इनामदार इंग्लिश मिडियम स्कूल, वडगाव शेरी
व्हीक्‍टोरीयस किड्‌स स्कूल, खराडी.
ई कोल हेरिटेज, औंध
एज्युकॉन स्कूल, औंध


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)