सतत रडत असल्याने आईने घेतला बाळाचा जीव 

भिवंडी: मुलाच्या रडण्यामुळे कंटाळलेल्या आईने थेट त्याचा जीव घेतला. सहा महिन्यांच्या बाळाला पाण्यात बुडवून मारणाऱ्या आरोपी आईला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना भिवंडी तालुक्‍यातील कोलिवली कवाड भागात घडली आहे. कल्पना निलेश गायकर असे आरोपी महिलेचे नाव आहे.
कल्पनाचा सहा महिन्यांचा मुलगा ऋषभ सारखा आजारी पडायचा. बरे नसल्यामुळे तो सतत रडत असायचा. बाळंतपणानंतर कल्पनाची प्रकृतीही ठीक नसायची. त्यामुळे वैतागून तिने बाळाला नाल्यातील पाण्यात बुडवले. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचे कल्पनाने भासवले. मात्र भिवंडी पोलिसांनी बाळाच्या मृत्यूचे गूढ उकलून तिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)