सततच्या पराभवाने शरद पवारांना नैराश्‍य – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर – गेल्या चार वर्षांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रत्येक निवडणुकीत पराभव होत आहे. हा पक्ष अनेक घटकांना उचकावण्याचा प्रयत्न करत आहे, पण ते घटक उचकत नसल्यानेच शरद पवार यांना नैराश्‍य आल्याची टीका महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. पवार यांनी पंतप्रधानांच्या अनुषंगाने केलेली टीका चुकीची असून त्यांनी या पदाचा प्रतिष्ठा जपावी, अशीही अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पुण्यात रविवारी पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेबाबत पवार यांनी बोचरी टीका केली होती. त्यास चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, पवार यांनी स्वत: मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ व उंचीने मोठे असणाऱ्या व्यक्तीने अशी टीका करणे योग्य नाही. भाजपला प्रत्येक निवडणुकीत यश मिळत आहे. सातत्याने मिळणाऱ्या अपयशामधून पवार यांनी नैराश्‍यपोटी मोदी यांच्यावर टीका करत आहेत. निवडणुका आल्या की राष्ट्रवादी कॉंग्रेसला जात आठवते. निवडणुकीच्या राजकारणासाठी जातीयवाद निर्माण करणे योग्य नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाटील म्हणाले, केंद्र व राज्यात आतापर्यंत कॉंग्रेस आघाडीचे सरकार होते. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षण का दिले नाही? आता त्यांना त्याची तीव्रता वाटू लागली आहे. आम्ही न्यायालयात मराठा आरक्षण प्रश्नी ताकदीने लढत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)