सततची पाठदुखी? दुर्लक्ष करू नका आणि तुमचे प्रोस्टेट वेळीच चेक करा

इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सरमध्ये ५  ते १६ जानेवारी २०१९ पर्यंत  मोफत तपासणी शिबिर

पुणे:पुरुषांमधील प्रोस्टेट कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून आकड्यांनुसार ६ मधील १ पुरुष प्रोस्टेट कॅन्सरग्रस्त आहे. ह्या गंभीर आजारांवर मात करण्यासाठी त्यावर लवकरात लवकर उपचार होणे अत्यंत महत्वाचे आहे. ५ जानेवारी ते १६ जानेवारी, २०१९ ह्या कालावधीत इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सरने मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जवळपास ६० टक्के रुग्ण डॉक्टरांना भेटतात जेव्हा ते शेवटच्या टप्यावर पोहचलेले असतात, ८०%- ९०% संपूर्ण बरे झालेल्या रुग्णांचे निदान अगदी पहिल्या टप्प्यात झालेले असते. दुर्दैवाने भारतात मात्रह्यासंबंधी जागरूकता नसल्याने कित्येक रुग्ण अगदी शेवटच्या टप्प्यात उपचाराला येतात जेव्हा उशीर झालेला असतो असे मत आयपीसीचे कन्सल्टंट युरोलॉजीस्ट डॉ. देशमुख हृषीकेश यांनी व्यक्त केले.प्रोस्टेट कॅन्सर हा अत्यंत हळू गतीने वाढत असून अखेर प्राणघातक ठरतो त्यामुळे त्याचे प्राथमिक टप्प्यात निदान होऊन त्यावर उपचार होणे अत्यंत महत्वाचे आहे असेही ते म्हणाले.

इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सर (IPC) मागील ५ वर्षांपासून प्रोस्टेट कॅन्सर आणि त्याचे निदान करण्यासाठी उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे ज्यात १३० पेक्षा जास्त शिबिरांच्या माध्यमातुन७०,००० पेक्षा जास्त लोकांची जनजागृती करण्यात आली आहे.

भविष्यात प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी ५० वर्षांपूढील पुरूषांनी पीएसए आणि डीआरई तपासणी करण्याचा सल्ला इन्स्टिट्यूट फॉर प्रॉस्टेट कॅन्सरने दिला असून कोणत्याही प्रकारच्या पाठदूखीकडेदुर्लक्ष करू नये असे देखील सुचवले आहे. जर वेळेत निदान झाले तर हा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. विशेषत: ५०  वर्षे वयानंतर कोणत्याही पाठीच्या

दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका.

प्राथमिक टप्प्यात निदान झाल्यास रुग्ण १००% बरा होऊ शकतो. उशीर झाल्यास प्रोस्टेट प्राणघातक ठरू शकतो त्यामुळे तुमच्या सततच्या  पाठदुखीवर दुर्लक्ष करू नका आणि तुमचे प्रोस्टेट वेळीच चेक करा.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)