सणावाराची सरकारी भेट : टीव्ही-फ्रीझसह 19 वस्तू झाल्या महाग

नवी दिल्ली – दसरा-दिवाळीसारखे सण जवळ आले असता केंद्र सरकारने टीव्ही, फ्रीझ, वॉशिंग मशीनसह 19 वस्तूवरील कस्टम ड्यूटीत वाढ करून त्या महाग केल्या आहेत. हे 2.5 ते 10 टक्के वाढीव दर बुधवारी रात्रीपासून लागू होणार असल्याने गुरुवारपासून या 19 वस्तू महाग होणार आहेत.

कस्टम ड्यूटी वाढवण्यात आलेल्या वस्तूंमध्ये टेलिव्हिजन, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, आणि मोबाईल सह अन्य वस्तूंचा समावेश आहे. वाढत्या चालू खाते तूट समस्येतून मार्ग काढण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात आले आहे. कस्टम ड्यूटीत वाढ करण्यात आलेल्या या 19 वस्तूंची वार्षिक सुमारे 86,000 कोटी रुपयांची आयात केली जाते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)