सणामुळे फळांच्या मागणीत वाढ

पिंपरी – कृष्ण जन्मअष्टमी आणि दहीहंडी सणानिमित्त फळांची आवक वाढली असून, मागणीदेखील वाढली आहे. . मागील काही दिवसांपासून पावसाची रिमझीम सुरू असल्याने फळ बाजार थंडावला होता. परंतु, श्रावण महिन्यात असलेले सण त्यासाठी लागणारे फळे याचा अंदाज विक्रेत्यांना आल्याने त्यांनी फळांचा स्टॉक आधीच केला असल्याची माहिती फळ विक्रेता कुमार शिरसाठ यांनी दिली.

श्रावणात विविध व्रतवैकल्ये केली जात असल्याने पूजेसाठी फळाला विशेष मागणी असते. या दिवसात नागरिकांचे उपवास असल्याने फळाची विक्रमी विक्री होत असते. परंतु, पावसाने या महिन्यात उघडीप दिली नव्हती. मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने फळांच्या स्टॉलवर गर्दी दिसत आहे. आज दिवसभर पावसाची रिमझीम सूरू असूनही सणामुळे बाजारपेठ गर्दीने फुलली होती. फळाची आवक वाढली असली तरी भावात वाढ झाली नाही. बाजारात कलमी पेरू 60 ते 80 रूपये किलो दराने विक्री सुरु आहे. पपईची आवक कमी झाली असली तरी भाव 40 रूपये किलो आहे. सिताफळाची आवक स्थिर असून, भाव 60 ते 80 रूपये किलो आहे. सध्या शिमल्यावरून येणाऱ्या सफरचंदांची आवक वाढली असून 100 ते 120 रूपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. मोसंबीची आवक घटली असून तिचे भाव 80 रूपये किलो आहे. केळीची आवक वाढली असून30 ते 40 रूपये डझन दराने विक्री होत आहे. महाराष्ट्रात संत्र्याचा मोसम नसल्याने इजिप्तवरून आयात केलेल्या संत्र्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याचे भाव 100 ते 120 रूपये किलो असल्याचे फळ विक्रेता मेघराज बालकर यांनी सांगितले. तसेच आलु बुखारा, पिअर्स यांची मागणी होत असून त्याचे भाव 200 रूपये किलो आहे.

महाराष्ट्रातून सांगली, सातारा, बारामती, नाशिक, इंदापूर टेंभूर्णी आदी ठिकाणांवरून डाळींबाची आवक वाढली असल्याने 20 रूपये किलोपासून 80 रूपये किलोपर्यंत त्याचे भाव आहेत. चांगल्या प्रतिच्या डाळींबांचे भाव 60 ते 80 रूपये किलोपर्यंत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)