सणसवाडी, शिक्रापुरात मटका अड्ड्यावर छापे

शिक्रापूर- शिक्रापूर तसेच सणसवाडी (ता. शिरूर) येथील एका ठिकाणी काही युवक मटका चालवीत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाल्यानंतर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने दोन्ही ठिकाणी छापे टाकत अकरा जणांना ताब्यात घेत गुन्हे दाखल केले असून, दहा हजार तीनशे नव्वद रुपये आणि मटक्‍याचे काही साहित्य जप्त केले आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांना सणसवाडी आणि शिक्रापूर येथील एका ठिकाणी काही युवक मटका आणि जुगार चालवत असल्याची माहिती मिळाली. त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे, प्रशांत माने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर खिलारे, पोलीस हवालदार उमेश जगताप, पोलीस नाईक योगेश नागरगोजे, तेजस रासकर, विजय गाले, आप्पासाहेब सूर्यवंशी यांच्या दोन वेगवेगळ्या पथकाने सणसवाडी येथे जाऊन छापा टाकला असता त्यांना त्या ठिकाणी काही युवक कल्याण नावाचा जुगार मटका खेळताना आढळून आले. त्यावेळी या पथकाने तेथील प्रवीण बबन दरेकर, तानाजी आप्पासाहेब वडघुले, संतोष काशिराम मनोहर (सर्व राहणार सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे), शिवाजी विठ्ठल देंदे (रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) अशा चौघांना शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांचे हस्तक असलेले अमोल पाटील, विलास पाटील (दोघांचे पूर्ण नाव पत्ता समजला नाही) अशा सहा जणांवर गुन्हे दाखल करत त्यांचेकडून 4 हजार 200 पन्नास रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
यांनतर या पथकाने त्यांचा मोर्चा शिक्रापूर येथे वळवीत त्या ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर देखील छापा टाकला. शिक्रापुरात वाडीलाल दलपत चव्हाण (रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे, मुळ राहणार अंबातांडा, ता. कन्नड जि. औरंगाबाद), ज्ञानेश्वर दिनकर देशमुख (रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ राहणार बेंडकाळ, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद), बालाजी सुरेश सोळुंके (रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ राहणार पालापूर, ता. निलंगा, जि. लातूर), भरत वैजीनाथ राऊत (रा. ढेरंगे वस्ती, कोरेगाव भीमा, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ राहणार चिंचोली, ता. अंबड जि. जालना) यांना ताब्यात घेत त्यांचे हस्तक महेश सातपुते (रा. भोसरी, पुणे, अशा पाच जणांवर गुन्हे दाखल करत त्यांचेकडून 6 हजार 160 रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. अशा प्रकारे शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकत अकरा जणांवर गुन्हे दाखल करत त्यांच्याकडून 10 हजार 390 रुपये आणि मटक्‍याचे काही साहित्य जप्त केले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय होले व दत्तात्रय शिंदे हे करत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)