सणसवाडी येथे आज नेत्ररोग निदान, आरोग्य शिबिर

सणसवाडी  -येथे गुरूवारी (दि. 31) माजी आमदार अशोक पवार यांचे वाढदिवसानिमित्त मोफत नेत्ररोग निदान व महाआरोग्य शिबिराचे आयोजन सकाळी 10 ते 4 या वेळेत करण्यात आले असून, त्याचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सणसवाडी ग्रामस्थांनी केले आहे. भैरवनाथ मंदिर सभागृहात होणाऱ्या या शिबिराचे उद्‌घाटन माजी आमदार अशोक पवार यांचे हस्ते करण्यात येणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर पंचायत समिती उपसभापती मोनिका नवनाथ हरगुडे या आहेत. यावेळी जि. प. सदस्या कुसुम मांढरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवि काळे, बाजार समितीचे संचालक दत्ता हरगुडे व ग्रामस्थ उपस्थित राहणार असून या शिबिरात मोफत नेत्र तपासणी महिलांची हिमोग्लोबीन तपासणी मोफत चष्मे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी, औषधोपचार करण्यात येतील अशी माहिती जिजामाता बॅंकेचे संचालक पंडीत दरेकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)