सणसवाडी इंटेलिजन्सच्या रडारवर

शिक्रापूर/सणसवाडी- एक जानेवारी रोजी झालेल्या दंगलीचे पडसाद महाराष्ट्रातच नव्हे; तर देशभर पसरले असल्याने या परिसराची सामाजिक वीण विस्कटली आहे. यात खतपाणी घालण्याचे काम सोशल मीडियातून होत आहे. सणसवाडी गाव इंटेलिझन्सच्या रडारवर असल्याने संवेदनशील क्षेत्र घोषित झाले आहे. यासाठी स्थानिकांनीच विस्कटलेली सामाजीक वीण पूर्ववत करण्यासाठी पुढाकार घेत गावचे गावपण टिकवण्यासाठी गावातील सर्व समाजामध्ये संवाद घडविण्यास पुढे येण्याची गरज असल्याचे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केले.

वढु बुद्रुक (ता. शिरूर) येथील तणाव ग्रामस्थांनी गावातच मिटविला, मग सणसवाडीतला तणाव का मिटत नाही? याचा विचार करण्याची गरज आहे. गावपण टिकविण्यासाठी आता गावची भूमिका बदलावी लागणार आहे. यासाठी तरुणांची भडकलेली माथी शांत करतानाच गावात संवाद वाढवण्यासाठी समाजमन जोडण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे.
-विश्वास नांगरे पाटील, पोलीस महानिरीक्षक

सणसवाडी (ता. शिरूर) येथे 25 एप्रिलला ग्रामस्थ व महिलेला शिवीगाळ व दमदाटी केल्यावरून सणसवाडी ग्रामस्थांनी रास्ता रोको व गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करीत सुरेश सकट यांच्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या पार्श्वभूमिवर कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटिल यांनी सणसवाडी येथे भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. या प्रसंगी पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे, पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे, चेतन थोरबोले, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, सरपंच रमेश सातपुते, उपसरपंच सुनिता दरेकर, पोलीस पाटील दत्तात्रय मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष वैभव यादव, माजी सरपंच आशा दरेकर, अजित दरेकर, ऍड. विजयराज दरेकर, माजी उपसरपंच दत्ताभाऊ हरगुडे, जिजामाता बॅंकेचे संचालक पंडित दरेकर, नवनाथ हरगुडे, शिवाजी दरेकर, ज्येष्ठ नेते सुदाम पवार, बाळासाहेब सैद, सागर दरेकर, अनिल दरेकर, रामदास दरेकर, अश्विनी दरेकर, अलका दरेकर यांसह आदी मान्यवर व ग्रामस्थ ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, स्वरक्षणासाठी केलेल्या प्रतिकारातूनही आमच्या ग्रामस्थांवर गुन्हे दाखल झाले, शिक्षा भोगली तरी पुन्हा-पुन्हा गुन्ह्यांमध्ये आम्हाला गोवले जात असल्याने ग्रामस्थांची आता सहनशीलता संपली असल्याची प्रतिक्रिया दिली. तर यावेळी बाहेरच्या लोकांमुळे गावातील शांतता, सामाजीक सलोखा विस्कटल्याचे ग्रामस्थांनी सांगतानाच ऍट्रॉसिटीचा गैरवापर होत असल्याचीही यावेळी तक्रार केली केली. गावामध्ये ठराविक लोकांना लक्ष करण्यात येत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती महाराष्ट्रात सर्वात मोठी आम्ही करून दाखवू फक्त स्थानिकांनीच यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे यावेळी सांगितले.

नांगरे पाटील यांनी सांगितले की, सणसवाडी औद्योगिल क्षेत्र झपाट्याने वाढल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकरणातही वाढ झाली आहे. त्यामुळे गावामध्ये ताणतणावही वाढू लागल्याने सणसवाडी, कोरेगाव भीमा, वढु बुद्रुक व पेरणे परिसर संवेदनशील झाला आहे. या ठिकाणच्या उद्योग, व्यवसाय, व्यवहाराबरोबरच जनजीवनावरही याचा विपरीत परिणाम होत असल्याने सर्वांनी आत्मपरिक्षण करण्याचीही गरज असल्याचे सांगतानाच या ठिकाणी कोणती बाहेरची शक्ती गावचे वातावरण दूषित करीत आहे, याचा शोध लवकरच घेऊ. गावातील सामाजिक सलोखा जपण्यासाठी महापुरुषांच्या जयंत्या ह्या सर्व समाजाचा उत्सव म्हणून साजरा करण्यास पुढाकार घेण्याची गरज आहे.

 रोग एका गावाला औषध आमच्या गावाला
सणसवाडी (ता. शिरूर) येथे नांगरे पाटील मार्गदर्शन करत असताना सामाजिक सलोखा जपत एकोप्याने राहण्यासाठी दुसऱ्या गावचे उदाहरण देत असताना ग्रामस्थांपैकी अलका दरेकर ही महिला उठली आणि तिने “ओ साहेब रोग झाला एका गावाला औषध मारताय आमच्या गावाला’ असे म्हटल्याने एकच हशा पिकला आणि काही काळ शांतता पसरली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)