सणसवाडीत विविध मागण्यांसाठी कामगारांचे उपोषण

उपोषणास बसलेल्या कामगारांच्या प्रश्नावर आम्ही लक्ष देत असून कामगारांशी बैठक सुरु आहे. लवकरच कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन कामगारांचे उपोषण सोडले जाईल. – उमेश कुलकर्णी, व्यवस्थापक डिलक्‍स बेअरींग प्रा. लि.

दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू : महागाईमुळे वेतनवाढ देण्याची मागणी

शिक्रापूर – सणसवाडी (ता. शिरूर) येथील डिलक्‍स बेअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील कामगारांनी विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या वतीने 27 मार्चपासून कंपनीच्या प्रवेशव्दार (गेट) समोर आमरण उपोषण सुरु केले आहे. यामध्ये तीन महिलांचा देखील समावेश असून सर्व कामगार मंगळवार (दि.27) पासून आमरण उपोषणास बसले आहेत.

सणसवाडी (ता. शिरूर) येथील डिलक्‍स बेअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील 9 कामगारांनी वेतनवाढीचे तसेच त्यांच्या विविध मागण्यांचे मागणीपत्र कंपनी व्यवस्थापनाकडे सादर केले होते. मागणीपत्र सादर करून देखील कंपनी व्यवस्थापनाने कोणतीही भूमिका घेतली नसल्याने या कंपनीतील कामगार राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाच्या वतीने कंपनीतील कामगार संतोष तोरवे, गोरक्ष धुमाळ, तुकाराम कापरे, रामदास वाघमारे, योगेश देशमुख, अनिकेत दरेकर, लता वाडेकर, मनिषा रासकर आणि सुवर्णा नरके हे कामगार कंपनीच्या प्रवेशव्दारसमोर आमरण उपोषणास बसले आहेत. सर्व कामगार कंपनीसमोर उपोषणास बसल्यानंतर देखील कंपनी व्यवस्थापक अथवा कोणी याकडे फिरकले नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी देखील कामगारांनी उपोषण सुरूच ठेवले. आज काही कामगारांची प्रकृती देखील खालावली आहे. तर अलीकडील काळामध्ये वाढत असलेली महागाई त्यामुळे मिळणारे कमी वेतनमध्ये कुटुंब चालविणे, शालेय मुलांचा खर्च, रुग्णालय यांसह विविध खर्च देखील भागत नाही. त्यामुळे कंपनीकडे वेतनवाढ व विविध मागण्यांचे मागणीपत्र आम्ही सादर केले होते. त्यातून कंपनीने कोणताही पर्याय काढला नाही. त्यामुळे आम्हाला उपोषणास बसण्याची वेळ आली आहे. तर कंपनीच्या वतीने मंगळवारी कामगारांच्या प्रतिनिधीची बैठक आयोजित केली होती. मात्र, त्यातूनही काही मार्ग निघाला नसल्याने कामगारांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. तर बैठक कंपनीने लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात. परंतु कंपनी व्यवस्थापनाने आमच्या मागण्या मान्य करून मार्ग काढला नाहीतर सर्व कामगारांचे आंदोलन तीव्र करणार असे संतोष तोरवे आणि उपाध्यक्ष योगेश देशमुख यांनी सागितले आहे. सायंकाळपर्यंत कोणताही तोडगा निघाला नसल्याने कामगारांचे उपोषण सुरुच आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)