सणसवाडीत विचित्र अपघातात एकाचा मृत्यू

शिक्रापूर- सणसवाडी (ता. शिरूर) येथे पुणे-नगर रस्त्यावर शुक्रवारी (दि. 27) मध्यरात्रीच्या सुमारास विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकची नगरकडून पुण्याकडे येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्याने यावेळी झालेल्या अपघातात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मोहन विलास चोघले (वय 32 रा. म्हाळुंगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर श्रीकृष्ण मारुतराव देवकाते (रा. इसाद, ता. गंगाखेड, जि. परभणी) या ट्रक चालकाने स्वतः फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी (दि. 27) रात्री अडीचच्या सुमारास ट्रक (एमएच 12 एफसी 6460) वरील चालक हा येथील हिंदुस्थान पेट्रोलपंप येथून विरुद्ध बाजूने येऊन पुणे बाजूने वळत असताना नगरच्या दिशेने पुणेच्या दिशेने जाणाऱ्या कार (एमएच 09 ईके 9811) वर आदळला गेला यावेळी कार मधील चोघले यांचा जागीच मृत्यू झ्झाला. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)