सणसवाडीत प्रेम प्रकरणातून कामगार युवकाचा खून

शिक्रापूर- शिरूर तालुक्‍यातील सणसवाडी येथील एका कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका सुपरवायझर आणि एका कामगारामध्ये दोन दिवसांपूर्वी एका मुलीच्या प्रेम प्रकरणातून भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून सुपरवायझरने कामगाराचा चाकूने भोकसून खून केल्याची घटना सोमवारी (दि.20) सकाळी घडली आहे. यातील संशयित आरोपी सुपरवायझर फरार झाला आहे. दामोदर कृष्णा जबल (वय 40 वर्षे, रा. सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे मूळ राहणार धारावी, मुंबई) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर, संतोष शहाजी राठोड (रा. येडशी, ता. जि. उस्मानाबाद) असे सुपरवाझरचे नाव असून त्यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अमित अभिमन्यू जाधव (रा. सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, फिर्यादीनुसार, कंपनीत काम करणारा कामगार दामोदर जबल आणि सुपरवायझर संतोष राठोड यांच्यात 18 ऑगस्ट रोजी एका मुलीच्या प्रेमप्रकरणातून भांडणे झाली होती. त्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या लेबर कॉनट्रॅक्‍टचे मालक अमित जाधव यांनी 19 ऑगस्ट रोजी त्या दोघांना समजावून सांगून दोघांना देखील भेटायला बोलावले होते. त्यानंतर सोमवारी (दि.20) सकाळी कंपनी सुपरवायझर संतोष राठोड याने चिडून सणसवाडी येथील संचेती कंपनीजवळ कामगार दामोदर जबल याला चाकूने भोकसून खून करून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी कामगाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. मात्र, आरोपी संतोष राठोड हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. तर, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली असून आरोपीच्या शोधासाठी शिक्रापूर पोलिसांनी दोन स्वतंत्र पथके रवाना केली आहेत. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर हे करत आहे.

  • सणसवाडीकरांना झाली पहिल्या खुनाची आठवण
    सणसवाडी येथे सात महिन्यांपूर्वी गंगाराम दासरवड या युवकाचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. परंतु सात महिने उलटून देखील त्याच्या खुनाचा तपास लावण्यात शिक्रापूर पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. आज घडलेल्या घटनेमुळे सणसवाडी ग्रामस्थांना सात महिन्यांनी पुन्हा एकदा पहिल्या खुनाची आठवण झाली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)