सणसवाडीत प्रवासी महिलेचा रिक्षाचालकाकडून विनयभंग

शिक्रापूर- सणसवाडी (ता. शिरूर) येथे रिक्षाचालकाने प्रवासी महिलेचा पाठलाग करून विनयभंग केला असल्याचा प्रकार घडला. शिक्रापूर पोलिसांनी या रिक्षाचालकाविरुद्ध विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नवनाथ जाधव (रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. सणसवाडी येथे त्याने प्रवाशी महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला असून याबाबत पीडित महिलेने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पीडित महिला ही एका रिक्षाने शिक्रापूर ते कोरेगाव भीमा असा प्रवास करत असताना नवनाथ हा त्याची रिक्षा घेऊन सणसवाडीपर्यंत या रिक्षाचा पाठलाग करत आला.

ही महिला प्रवास करत असलेली रिक्षा सणसवाडी येथे थांबली असताना नवनाथ जाधव याने या महिलेचा हात पकडून तिला ओढत खाली घेण्याचा प्रयत्न केला आणि महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)